Friday, May 9, 2025

मनोरंजनताज्या घडामोडी

Aishwarya Rai Bachchan: ऐश्वर्या राय बच्चनच्या गाडीला बसने मागून दिली टक्कर, समोर आली ही अपडेट

Aishwarya Rai Bachchan: ऐश्वर्या राय बच्चनच्या गाडीला बसने मागून दिली टक्कर, समोर आली ही अपडेट

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या(Aishwarya Rai Bachchan) कारचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत दिसत आहे की ऐश्वर्या रायच्या कारला एका बसने मागून टक्कर दिली. यानंतर चाहते टेन्शनमध्ये आले की अभिनेत्रीला कोणती दुखापत झाली नाही ना? दरम्यान, चाहत्यांनी टेन्शन घ्यावी अशी कोणतीही गोष्ट नाही. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. तसेच गाडीचेही कोणते नुकसान झालेले नाही.



ऐश्वर्याच्या कारला केले हिट


२६ मार्चला दुपारी एक व्हिडिओ शेअर करण्यात आला. या व्हिडिओत दाखवले की जुहूमध्ये बेस्टच्या एका मोठ्या बसने मागून ऐश्वर्याच्या कारला हिट केले. यानंतर ऐश्वर्याचे बॉडीगार्ड कारमधून बाहेर येतात. दरम्यान, कारला मोठी दुखापत झाली नसल्याचे त्यांना दिसते आणि थोड्या वेळानंतर ऐश्वर्या रायची कार निघून जाते.


 



 










View this post on Instagram























 

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)





मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्याच्या चाहत्यांसाठी चांगली बाब म्हणजे जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा ऐश्वर्या राय बच्चन त्या गाडीमध्ये नव्हती.


ऐश्वर्या राय बच्चन गेल्या काही दिवसांपासून आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत होती. अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यात काही आलबेल नसल्याचे बोलले जात होते. दोघेही घटस्फोट घेण्याच्या विचारात आहेत अशी चर्चा होता. मात्र, काही काळानंतर ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र दिसले. अभिषेकने आपली अंगठी दाखवताना म्हटले होते की तो अद्याप विवाहित आहेत. अभिषेकने त्या अफवा फेटाळून लावल्या होत्या.

Comments
Add Comment