Tuesday, May 6, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

छत्तीसगडमध्ये १५ नक्षलवादी आले शरण

छत्तीसगडमध्ये १५ नक्षलवादी आले शरण
सुकमा : छत्तीसगडमध्ये सुरक्षा पथकांच्या कारवाईत मारले जाण्याच्या भीतीने नक्षलवादी शरण येऊ लागले आहेत. राज्यात एका दिवसात १५ नक्षलवादी शरण आले आहेत. यातील काही नक्षलवाद्यांवर बक्षिस लावण्यात आले होते. या बक्षिसाची एकूण रक्कम ३९ लाख रुपये एवढी आहे. केंद्र सरकारने ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी कठोर पवित्रा घेतला आहे. केंद्राने कठोर पवित्रा घेतल्यापासून शरण येत असलेल्या नक्षलवाद्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. छत्तीसगडमधील सुकमात नऊ आणि दंतेवाडात सहा नक्षलवादी शरण आले आहेत.
सुकमात पूना नर्कोम आणि दंतेवाडात लोन वर्राटू नावाने नक्षलवाद्यांच्या विरोधात सुरक्षा पथकांची मोहीम सुरू आहे. ही मोहीम सुरू झाल्यापासून नक्षलवादी शरण येण्याचे प्रमाण वाढले आहे. सुकमात जे नऊ नक्षलवादी शरण आले त्यांच्यातील काही जणांवर बक्षिस लावण्यात आले होते. या बक्षिसाची एकूण रक्कम २६ लाख रुपये एवढी आहे. तसेच दंतेवाडात जे सहा नक्षलवादी शरण आले त्यांच्यातील काही जणांवर बक्षिस लावण्यात आले होते. या बक्षिसाची एकूण रक्कम १३ लाख रुपये एवढी आहे. दंतेवाडात दोन महिला आणि चार पुरुष नक्षलवादी शरण आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दंतेवाडात लोन वर्राटू मोहिमेला यश येत आहे. आतापर्यंत दंतेवाडात ९१२ नक्षलवादी शरण आले आहेत. यातील २२१ नक्षलवाद्यांवर वेगवेगळ्या रकमेचे बक्षिस लावलेले होते.
Comments
Add Comment