Saturday, April 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजजयकुमार गोरे प्रकरणात शरद पवार गटाचा सहभाग

जयकुमार गोरे प्रकरणात शरद पवार गटाचा सहभाग

सुळे आणि रोहित पवार आरोपीच्या संपर्कात – फडणवीसांचा आरोप

मुंबई : मंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore case) यांना अडकवण्याच्या कटात शरद पवार गटाचा मोठा सहभाग असल्याचा थेट आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला. या प्रकरणात खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार हे आरोपी तुषार खरातच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला.

फडणवीस म्हणाले, “जयकुमार गोरे यांच्याविरोधातील केस २०१६ मध्ये दाखल झाली आणि २०१९ मध्ये संपली. तेव्हा ते भाजपमध्ये नव्हते. तरीही, त्यांनी ब्लॅकमेलिंगचा बळी न बनता लाचेची मागणी झाल्यानंतर थेट पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर सापळा रचून आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले.”

Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरला ३ दिवसांची पोलीस कोठडी

मी त्यांच्या हिंमतीची दाद देतो, एखादा व्यक्ती अशा परिस्थितीत दोषी आहोत की नाही आहोत, घरच्यांना समाजात अपमान नको म्हणून अशा गोष्टी मिटवण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांनी लाचेची मागणी झाल्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. तक्रारीनंतर ट्रॅप लावला, सगळं संभाषण टेप झालं, सगळी मागणी टेप झाली. मागणी टेप झाल्यानंतर पोलीस विभागाची खात्री पटली त्यानंतर सापळा रचला. पैसे देताना आरोपीला पकडलं. हा ब्लॅकमेलिंगचाच प्रकार होता.

या प्रकरणात एकूण चार तक्रारी दाखल झाल्या असून, आरोपींनी खोट्या प्रचाराद्वारे एका महिलेचा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्याशी संबंध असल्याचा दावा केला होता. या कटात संबंधित महिलेसह तुषार खरात आणि अनिल सुभेदार यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील लोकांना अटक झाली आहे. एक ती महिला आहे. दुसरा तुषार खरात आणि तिसरा अनिल सुभेदार आहे. या सगळ्यांनी मिळून हा कट रचला. याबाबत सगळे पुरावे सापडले आहेत. त्यांचे व्हाट्सअप वरचे संभाषण सापडले आहे.

फडणवीस यांनी दावा केला की, आरोपींमध्ये झालेली फोनवरची १५० हून अधिक संभाषणे आणि व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्याशी त्यांचा थेट संबंध असल्याचे दिसून येते. “प्रभाकरराव देशमुख हे तीनही आरोपींशी थेट संपर्कात होते, तर सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरात याच्यासोबत झाले आहेत. जयकुमार गोरे यांच्या विरोधातील व्हिडिओ आरोपींनी तयार करून सुळे आणि पवार यांना पाठवले,” असे पुराव्यांसह सांगत फडणवीस यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली.

“मी हे पुराव्यानिशी सांगत आहे. प्रभाकरराव देशमुख हे थेट तिन्ही आरोपींशी बोललेले आहेत. मला वाईट वाटतं ते म्हणजे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरात सोबत आहेत. गोरे यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी सुळे आणि पवार यांना पाठवले आहेत. आता याची चौकशी होणार आहे. हे चाललं काय आहे. आपण राजकीय विरोधक आहोत, शत्रू नव्हे. मात्र, राजकीय स्पर्धेतून कोणाचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त करण्याचा हा प्रकार अयोग्य आहे. अशाप्रकारे कोणाला जीवनातून उठवणे चुकीचे आहे,” असेही फडणवीस यांनी ठामपणे स्पष्ट केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -