मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांची पत्नी (Sonu Sood wife) सोनाली सूद यांना मंगळवारी मुंबई-नागपूर महामार्गावर झालेल्या मोठ्या अपघातात (accident on Mumbai-Nagpur highway) दुखापत झाली. मिळालेल्या माहितीनुसार, त्या आपल्या पुतण्यासोबत प्रवास करत असताना हा अपघात झाला. अपघातानंतर दोघांना तातडीने मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सोनू सूद यांनी दिली प्रतिक्रिया
अपघाताबाबत प्रतिक्रिया देताना सोनू सूद यांनी “ती आता पूर्णपणे ठीक आहे. एक मोठा अपघात टळला. ओम साई राम,” असे म्हटले आहे.
या अपघातातून सोनाली सूद सुखरूप बचावल्याने चाहत्यांनी सुटकेचा श्वास घेतला असून, सोशल मीडियावर त्यांच्या जलद प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना केली जात आहे.