Friday, April 18, 2025
Homeताज्या घडामोडीकाश्मीरमध्ये फुटीरतावाद इतिहास जमा, पंतप्रधान मोदींच्या स्वप्नांचा विजय झाल्याचा अमित शहा यांचा दावा

काश्मीरमध्ये फुटीरतावाद इतिहास जमा, पंतप्रधान मोदींच्या स्वप्नांचा विजय झाल्याचा अमित शहा यांचा दावा

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील हुर्रियतमध्ये फूट पडली आहे. जे अँड के पीपल्स मूव्हमेंट आणि डेमोक्रॅटिक पॉलिटिकल मूव्हमेंटने स्वतःला फुटीरतावादापासून वेगळे केले आहे. यावर गृहमंत्री अमित शहा यांनी विधान केले आहे. त्यांनी एक्सवर लिहिले आहे की, काश्मीरमध्ये फुटीरतावाद इतिहास जमा झाला आहे. त्यांनी याला पंतप्रधान मोदींच्या स्वप्नाचा विजय म्हटले आहे.

गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे की, मोदी सरकारच्या एकात्म धोरणांमुळे जम्मू-काश्मीरमधून फुटीरतावाद बाहेर पडला आहे. हुर्रियतशी संबंधित दोन संघटनांनी फुटीरतावादाशी असलेले सर्व संबंध तोडण्याची घोषणा केली आहे. भारताची एकता मजबूत करण्याच्या दिशेने उचलेले हे पाऊल असून याचे मी स्वागत करतो आणि अशा सर्व गटांना पुढे येऊन फुटीरतावाद कायमचा सोडून देण्याचे आवाहन करतो. पुढे गृहमंत्री अमित शहा यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, जम्मू काश्मीरमधील फुटीरतावाद संपत आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विकसित, शांत आणि एकात्म भारत निर्माण करण्याचे हे एक मोठे यश असून, त्यांचा हा मोठा विजय आहे.

‘या’ मोबाईल नंबरचे UPI अकाऊंट एक एप्रिलपासून बंद होणार

मोदी सरकारच्या एकत्रीकरण धोरणांमुळे जम्मू-काश्मीरमधून फुटीरतावाद संपला आहे. हुर्रियतशी संबंधित दोन संघटनांनी फुटीरतावादाशी सर्व संबंध तोडल्याची घोषणा केली आहे. भारताची एकता मजबूत करण्याच्या दिशेने उचललेल्या या पावलाचे मी स्वागत करतो आणि अशा सर्व गटांना पुढे येऊन कायमस्वरूपी फुटीरतावाद संपवण्याचे आवाहन करतो. गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, विकसित, शांततापूर्ण आणि एकात्मिक भारताचे निर्माण करण्याचे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न आहे.

जम्मू काश्मीरमधील पाकिस्तान समर्थनार्थ आणि भारत विरोधी वेगवेगळ्या विचारसरणीचे अनेक राजकीय, सामाजिक आणि धार्मिक पक्ष त्यांच्या फुटीरतावादी अजेंडामुळे एकत्र आले. त्यानंतर १९९३ मध्ये हुर्रियत कॉन्फरन्सची स्थापना झाली. धर्माच्या समानतेवर लक्ष केंद्रित करून जम्मू-काश्मीरचे पाकिस्तानमध्ये विलीनीकरण करण्यासाठी मोहीम राबवत, या नव्याने स्थापन झालेल्या गटाने लोकांमध्ये पाकिस्तान समर्थक भावना पुनरुज्जीवित करण्यात यश मिळवले. येथील फुटीरतावाद्यांचे मुख्य उद्दिष्ट्य म्हणजे जम्मू-काश्मीरचे पाकिस्तानमध्ये विलीनीकरण करणे हे होते. हुर्रियत आणि जम्मू-काश्मीरमधील अतिरेकी गट हा नेहमीच एकमेकांना पूरक राहिला आहे.

काश्मीरमध्ये बदलाचे वारे वाहत असताना आणखी एक कट्टरपंथी फुटीरतावादी ॲडव्होकेट मोहम्मद शफी रेशी यांनी हुर्रियत कॉन्फरन्स आणि डेमोक्रॅटिक पॉलिटिकल मूव्हमेंट (डीपीएम) शी संबंध तोडल्याची घोषणा केली होती. त्यांनी भारताच्या सार्वभौमत्वाला अखंडतेवर विश्वास व्यक्त करत म्हटले की, माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी, विशेषतः काश्मीरच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या किंवा काश्मीरला भारतातून वेगळे करण्याच्या कोणत्याही फुटीरतावादी संघटनेशी कोणताही संबंध नाही.

ॲडव्होकेट रेशी कट्टरपंथी सय्यद अली शाह गिलानी यांच्या नेतृत्वाखालील हुर्रियत कॉन्फरन्सच्या प्रमुख नेत्यांपैकी एक मानले जात होते. ते डीपीएमचे अध्यक्षही राहिले आहेत. रेशी यांनी सोमवारी रात्री सांगितले की, माझा हुर्रियत कॉन्फरन्स किंवा डीपीएम किंवा इतर कोणत्याही फुटीरतावादी संघटनेशी कोणताही संबंध नाही. मी यापूर्वी डीपीएममधून राजीनामा दिला आहे. हुर्रियत आणि त्यांच्यासारख्या इतर पक्षांचे खरे स्वरूप समजल्यामुळे मी सात वर्षांपासून स्वतःला फुटीरतावादी कारवायांपासून दूर ठेवले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -