Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीआता मुंबईकरांना गुढीपाडव्यासाठी ऑनलाईन मिळणार पुरणपोळी

आता मुंबईकरांना गुढीपाडव्यासाठी ऑनलाईन मिळणार पुरणपोळी

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महिला बचत गटांनी तयार केलेली पुरणपोळी मुंबईकरांना ‘ऑनलाइन’ उपलब्ध होणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महानगरपालिकेने ५० बच त गटांना एकत्र आणून ‘पुरणपोळी महोत्सव’ सुरू केला आहे. पुरणपोळीची मागणी https://shgeshop.com या संकेतस्थळावर नोंदविता येणार आहे. यासाठीची नोंदणी सुरू झाली असून २८ मार्चपर्यंत मुंबईकर पुरणपोळीची मागणी नोंदवू शकतात. गुढीपाडव्याच्या दिवशी ३० मार्च रोजी पुरणपोळी घरपोच मिळणार आहे.

https://shgeshop.com या संकेतस्थळावर आपण मागणी नोंदविल्यानंतर आपल्या नजीकच्या चार किलोमीटर परिसरातील महिला बचत गटाकडे याची नोंद होणार आहे. त्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण निवडलेल्या वेळेनुसार पुरणपोळी पोचवली जाणार आहे. महिला सशक्तीकरणसाठी महानगरपालिका सतत महिलांना वेगवेगळे व्यासपीठ उपलब्ध करून देत असते.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेने महिलांचे आर्थिक सशक्तीकरणासाठी विविध पावले उचलली आहेत. रोजगाराच्या शोधात असणाऱ्या आणि हाती कला असलेल्या महिलांना एकत्र आणून महानगरपालिकेने महिला बचत गट निर्माण केले आहेत. हे बचत कपडे, विविध पर्स, कापडी पिशव्या, आभूषणे, घरगुती वापराच्या वस्तू तयार करतात.

आता या बचत गटांनी पारंपरिक व्यवसायाच्या कक्षा रुंदावत ऑनलाइन पटलावरही ठसा उमटविला आहे. काही दिवसांपूर्वीच महिला बचत गटाच्या सदस्यांना ‘झोमॅटो’सोबत करार करून खाद्यपदार्थ वितरणाचा रोजगारही बृहन्मुंबई महानगरपालिकेने उपलब्ध करून दिला आहे. आता यंदाच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महानगरपालिकेने ५० बचत गटांना एकत्र आणून ‘पुरणपोळी महोत्सव’ सुरू केला आहे. हे सर्व ५० महिला बचत गट ऑनलाइन प्रणालीचा वापर करून मुंबईकरांना पुरणपोळी थेट घरपोच पाठवणार आहेत. एसएचजी ई शॉप (shgeshop) या ऑनलाइन संकेतस्थळ प्रणालीद्वारे खवय्यांसाठी घरपोच पुरणपोळी पुरविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठीची नोंदणी देखील सुरू झाली आहे, अशी माहिती संचालक (नियोजन) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर यांनी दिली.

अशी नोंदवा मागणी

पुरणपोळी महोत्सवात पुरणपोळीची मागणी https://shgeshop.com या संकेतस्थळावर नोंदवता येणार आहे. यासाठीची नोंदणी सुरू झाली आहे. २८ मार्चपर्यंत मुंबईकर मागणी नोंदवू शकतात. गुढीपाडव्याच्या दिवशी या पुरणपोळींचे घरपोच वितरण करण्यात येणार आहे. एक सदस्य एक मागणी नोंदवताना साधारणपणे कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त दहा पुरणपोळींची मागणी नोंदवू शकतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -