Saturday, May 10, 2025

विदेशताज्या घडामोडी

New Zealand: न्यूझीलंडमध्ये ७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा मोठा धक्का

New Zealand: न्यूझीलंडमध्ये ७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा मोठा धक्का

नवी दिल्ली: न्यूझीलंडच्या रिवर्टन किनाऱ्यावर मंगळवारी ७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा मोठा झटका बसला. युनायटेड स्टेट्‍स जिओलॉजिकल सर्व्हेने एक्सवर एका पोस्टच्या माध्यमातून ही भूकंपाची माहिती दिली. भूकंपाचा झटका रिवर्टनपासून १५९ किमी पश्चिम-दक्षिण पश्चिममध्ये जाणवला. याचे केंद्र जमिनीपासून १० किमी खोल होते.


दरम्यान, भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. न्यूझीलंड भूकंप प्रवण क्षेत्रात येते त्यामुळे येथे सातत्याने अशा घटना घडत असतात. संबंधित अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.



भूकंपामुळे त्सुनामीचा धोका


न्यूझीलंडमध्ये आलेल्या ७ तीव्रतेच्या भूकंपानंतर अधिकांश प्रभावित क्षेत्र भूकंप प्रतिरोधा इमारतींपासून सुरक्षित आहेत. या भूकंपामुळे त्सुनामीचा धोका निर्माण होऊ शकतो का याचा अभ्यास केला जात आहे. जर त्सुनामीची स्थिती निर्माण झाली तर त्याला देशापर्यंत पोहोचण्यासाठी कमीत कमी एक तासाचा वेळ लागेल.



न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्चमध्ये भूकंप


याआधी २०११मध्ये न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्चमध्ये आलेल्या ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे १८५ लोकांचा जीव गेला होता.

न्यूझीलंडमधील सर्वात मोठा भूकंप


न्यूझीलंडच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा भूकंप १९३१मध्ये हॉक्स बे क्षेत्रात आला होता. याती तीव्रता ७.८ रिश्टर स्केल इतकी होती. यात २५६ लोकांचा मृत्यू झाला होता. हा भूकंप न्यूझीलंडच्या इतिहासातील घातक भूकंपापैकी एक आहे.
Comments
Add Comment