
बिनविरोध निवड आज जाहीर होणार!
मुंबई : अण्णा बनसोडे (Anna Bansode) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी केवळ महायुतीच्यावतीने बनसोडे यांचा अर्ज आला होता. आज दुपारी अर्ज पडताळणीत वैध ठरला आहे. बुधवारी (दि. २६ मार्च) सभागृहात विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांची नियुक्ती करण्यात आल्याची अध्यक्षांकडून घोषणा केली जाणार आहे. विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी तीन नावे चर्चेत होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांची विधानसभा उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

पुणे : पुण्यातील दौंड शहरात असणाऱ्या कचऱ्याच्या ढिगार्यात अर्भक आणि मानवी शरीराचे काही अवशेष आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.यामुळे तेथील परिसरात ...
विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी पुणे जिल्ह्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांचं नाव चर्चेत होतेच, मात्र त्यांच्या नावाशिवाय लातूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री संजय बनसोडे, तसेच गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोले या तिघांची नावे चर्चेत होती. मात्र, अखेर अण्णा बनसोडे विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. अण्णा बनसोडे अजित दादा समर्थक आमदार आहेत. त्याचबरोबर पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
कोण आहेत अण्णा बनसोडे?
अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. ते पुणे जिल्ह्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले आहेत. २००९ मध्ये पहिल्यांदा आमदारपदी विराजमान झाले होते. त्यानंतर २०१९ आणि २०१४ असे सलग दोनवेळा आमदारकी मिळवली. राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर ते अजित पवार यांच्यासोबत राहिले आणि २०२४च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा त्यांनी बाजी मारली. दादांच्या बालेकिल्ल्याचे पिंपरीचे शिलेदार म्हणून अण्णा बनसोडे यांची ओळख आहे.