थकीत जलदेयके भरण्याचे महापालिकेचे नागरिकांना आवाहन
मुंबई : जलजोडणीधारकांना जलदेयकातील प्रलंबित अतिरिक्त आकारापासून विशेष सूट देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे ‘अभय योजना’ राबविली जात आहे. या अभय योजने अंतर्गत थकीत जलदेयक रकमेचा एकरकमी भरणा केल्यास अतिरिक्त आकार माफ करण्यात येतो. येत्या ३१ मार्च २०२५ रोजी आर्थिक वर्षअखेर आहे. त्यामुळे, जलदेयकांच्या अधिदानाकरीता शनिवारी २९ मार्च २०२५, रविवारी ३० मार्च २०२५ या साप्ताहिक सुटी आणि सोमवारी ३१ मार्च २०२५ रोजी सार्वजनिक सुटीच्या दिवशी नागरी सुविधा केंद्र सकाळी आठ ते रात्री बारा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. तरी संबंधितांनी याचा लाभ घ्यावा व सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ पूर्वी जलदेयकांचा भरणा करावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.
कल्याण आणि बदलापूर दरम्यान २९ – ३० मार्च रोजी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक
मुंबईतील नागरिकांनी त्यांच्या जल देयकांचा भरणा जलदेयकाच्या दिनांकापासून एका महिन्याच्या आत करणे बंधनकारक आहे. एका महिन्याच्या आत देयकाचे पैसे न भरल्यास त्यावर अतिरिक्त आकारणी केली जाते. या अतिरिक्त आकाराबाबत जल जोडणीधारकांना विशेष सूट देण्यासाठी ‘अभय योजना’ सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत जलदेयकातील प्रलंबित अतिरिक्त आकारापासून विशेष सूट देण्यात येत आहे. येत्या ३१ मार्च २०२५ रोजी आर्थिक वर्षअखेर आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांना जलदेयकांचा भरणा करता यावा यासाठी शनिवारी २९ मार्च २०२५, रविवारी ३० मार्च २०२५ या साप्ताहिक सुटीच्या दिवशी आणि सोमवारी ३१ मार्च २०२५ रोजी रमजान ईद निमित्त सार्वजनिक सुटीच्या दिवशी नागरी सुविधा केंद्र सकाळी आठ ते रात्री बारा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनी, जलजोडणीधारकांनी, शासकीय-निमशासकीय कार्यालयांनी थकीत जलदेयकांचे ३१ मार्च २०२५ पूर्वी पैसे भरावे आणि अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.