Saturday, April 19, 2025
Homeक्रीडाIPL 2025IPL 2025 Points Table: दिल्लीच्या विजयानंतर बदलले पॉईंट्स टेबल, पाहा कोणता संघ...

IPL 2025 Points Table: दिल्लीच्या विजयानंतर बदलले पॉईंट्स टेबल, पाहा कोणता संघ कितव्या स्थानी

मुंबई: दिल्ली कॅपिटल्सची आयपीएल २०२५मधील सुरूवात विजयाने झाली आहे. त्यांनी पहिल्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सला एक विकेटनी हरवले. लखनऊने विजयासाठी २१० धावांचे आव्हान दिले होते. याला उत्तर देताना दिल्लीने एक विकेट राखत विजय मिळवला. दिल्लीच्या विजयासह आयपीएल २०२५च्या पॉईंट्स टेबलमध्येही बदल झाला आहे. लखनऊबद्दल बोलायचे झाल्यास ते पहिल्या पराभवासह पॉईंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानावर आहे.

दिल्ली कॅपिटल्स विजयासह आयपीएल २०२५च्या पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. त्यांनी एक सामना खेळला आणि जिंकला. तर सनरायजर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपरकिंग्स यांनीही सामने जिंकलेत. मात्र नेट रनरेटमुळे हैदराबाद अव्व्ल स्थानावर आहे. त्यांचा नेट रनरेट +2.200 इतका आहे तर बंगळुरूचा +2.137 रनरेट असल्याने ते दुसऱ्या स्थानावर आहेत. सीएसके +0.493 रनरेटसह तिसऱ्या स्थानावर आहेत.यानंतर दिल्लीचा संघ +0.371 इतका आहे.

IPL 2025: ती शेवटची ३ षटके ज्यामुळे दिल्लीने लखनऊच्या तोंडातून हिरावून घेतला विजयाचा घास

या चार संघांनी गमावले सामने

लखनऊसह मुंबई इंडियन्स , कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांना पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे हे संघ पॉईंट्स टेबलमध्ये खालच्या स्थानावर आहेत. लखनऊ सातव्या, मुंबई आठव्या, केकेआर नवव्या आणि राजस्थान दहाव्या स्थानावर आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -