गृहनिर्माण प्रकल्पांमुळे नियोजित लांबीत घट
पोलादपुर (वार्ताहर): मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील पोलादपुर शहरातील पश्चिमेकडील सर्विस रोडची लांबी नियोजित आराखड्यापेक्षा कमी असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पनवेल ते कशेडी घाटाला पर्यायी बुयारी मार्गापर्यंतच्या दौऱ्यात प्रस्तुत प्रतिनिधीने निदर्शनास आणून दिल्यानंतर आराखड्यानुसार सर्विस रोडची लांबी वादाविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. मात्र काही गृह निर्माण प्रकल्पामुळे अद्याप २५० मीटर पर्यंत लांची लांबी कमी असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ चे चौपदरीकरण पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाजवळ पूर्णत्वारा गेले आहे. मात्र, पोलादपूरच्या पश्चिमेकडील सर्व्हिसरोड आणि त्यावरील ट्रेनेज कम फूटपाथचे काम पूर्ण झाले असून त्या सहिंसरोडची रूंदी ७.५० मीटर्स तर लांबी १०८० मोटर्स तर ड्रेनेज कम फूटपाथची रुंदी १.५ मीटर्स असल्याचे राष्ट्रीय महानागांच्या अंतिम बाराखड्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. पोलादपूर शहरातील ग्रामीण रुग्णालयासह पार्टकोडपर्यंत सर्व्हितरोड व ड्रेनेज कम फुटपाथ असूनही हा पश्चिमेकडील सर्व्हिसरोड प्रभातनगर पश्चिमपर्यंतच दिसून येत आहे.
पोलादपूर घाटे लावाड येथे आराखड्यानुसार डेनेज कम फूटपाथची रुंदी १.५ मीटर्स असण्याऐवजी केवळ दोन फूट असलेली दिसून येत आहे. प्रत्यक्षात आणि आराखड्यामध्ये असलेल्या लांबी रुंदीतील तफावतीमुळे पश्चिमेकडील सर्व्हिसरोड ग्रामीण रुग्णालयाच्या प्रांगणातून पार्टकोडपर्यंत न जाता त्याआधीच प्रभातनगरपर्यंत संपलेला असल्याने ग्रामीण रुग्णालयापर्यंत रुग्ण आणि रुग्णवाहिका येण्यासाठी अडचण निर्माण झाली असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पनवेल ते कशेडी घायला पर्यायी भुयारी मार्ग काजली भोगावं पर्यंतच्या दौन्यात पत्रकारांनी लक्ष वेधले होते.
पश्चिमेकडील सर्विस रोड ची लांबी काटेतळी रस्त्यापासून उंबरकोड रस्त्यापर्यंत अशी एकूण १०८० मीटर्स नवीन नियोजित आराखड्यात दाखविण्यात आली आहे. मात्र, हा सहिंत रोड़ कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ देवस्थानच्या कमानी नंतर काही मीटर अंतरावर चौपदरीकरणाच्या अंडरपास बक्ति कटिंग महामार्गावर जोडला जाऊन संपुष्टात आला होता. पामुळे १०८० मीटरची लांबी पश्चिमेकडील सर्वित रोडला मिळाली नसल्याने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयापर्यंत जाणाऱ्या वाहनांना तसेच पादचाऱ्यांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
रस्ता दुभाजकावरून ग्रामीण रुग्णालयाकडे पायी अथवा वाहनाने येताना अपघात घडले असल्याने पश्चिमेकडील सर्विस रोडची लांबी आराखड्यानुसार उंबरकोडपर्यंत वाढवण्याची गरज स्पष्ट झालो होती. यामुळे सार्वजनिक बांधकाम शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या दौऱ्यात प्रस्तुत प्रतिनिधीने ही बाब निदर्शनास आणली होती.