मुंबई : दादरचा कबुतरखाना तसेच मुंबईतील सर्व अनधिकृत कबुतरखाने बंद करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा केली आहे. मनसेच्या या मागणीमुळे दादरचा कबुतरखाना तसेच मुंबईतील सर्व अनधिकृत कबुतरखाने कायमचे बंद होण्याची शक्यता वाढली आहे. मनसेच्या पर्यावरण सेनेने दादरचा कबुतरखाना तसेच मुंबईतील सर्व अनधिकृत कबुतरखाने बंद करण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलीस यांच्याकडे मागणी केली आहे. याआधी अनेक मुंबईकरांनीही दादर आणि मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणाच्या कबुतरखान्यांविषयी नाराजी व्यक्त केली आहे. स्वच्छता राखण्यासाठी आणि श्वसनाच्या आजारांवर नियंत्रण राखता यावे म्हणून कबुतरखान्यांना विरोध सुरू आहे.
५०० कुटुंबांच्या डोक्यावर अतिधोकादायक छप्पर; म्हाडाच्या स्ट्रक्चरल ऑडिटमधून समोर
मुंबईतील कबुतरांची (pigeon) संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे श्वसनाच्या आजाराचा धोकाही वाढत आहे. या विषयावर गेल्या काही वर्षांपासून समाजाच्या विविध स्तरातून जनजागृती सुरू आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेने कबुतरखान्यांना विरोध केला आहे.
मेट्रो स्थानकातून उतरून थेट कार्यालय, मॉल, कॉलेजमध्ये पोहोचता येणार
कबुतरखान्यांना विरोध मागील काही वर्षांपासून सुरू आहे. आता याची तीव्रता वाढू लागली आहे. अनधिकृत कबुतरखाने वाढू लागल्यामुळे मनसेने जाहीरपणे मुंबईतील कबुतरखान्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. यामुळे मुंबतल कबुतरखाने बंद होण्याची शक्यता वाढली आहे.
मुंबईत ठिकठिकाणी कबुतरांसाठी धान्य विकणाऱ्यांची संख्या वाढली आहे. हे धान्य विकत घेऊन तिथेच कबुतरांसाठी टाकले जात असल्यामुळे कबुतरांची संख्या वाढते आहे. ही कबुतरे मग आजूबाजूच्या रहिवासी इमारतीच्या खिडक्यांमध्ये घर करतात. त्यामुळे त्यांच्या विष्ठेतून व पिसांमधून श्वसनाचे आजार पसरत आहेत. नागरिकांच्या जिवाशी खेळणारे हे अनधिकृत कबुतरखाने बंद झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे, असे मनसेच्या पर्यावरण विभागाचे अध्यक्ष जय शृंगारपुरे यांनी सांगितले.