
महापालिकेच्यावतीने आता पंपिंग स्टेशनच्या कामाला लवकरच सुरुवात
मुंबई : भांडुप पश्चिम येथील डक्ट लाईन रोड,खिंडीपाडा आणि अमर नगर या डोंगराळ भागातील पाण्याची समस्या आता कायमस्वरुपी संपणार आहे. सध्या या भागातील लोकवस्तींना पाणी पुरवठा होत असला तरी पाण्याचा दाब योग्य रितीने नाही. त्यामुळे येथील नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळत असल्याने यावर मात करण्यासाठी पंपिंग स्टेशनची (Pumping Station) उभारणी केली जाणार आहे.त्यामुळे या लोकवस्तींना आता कायमस्वरुपी धो धो पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे.
भांडुप पश्चिम येथील डक्ट लाईन रोड,खिंडीपाडा आणि अमर नगर या वस्त्या डोंगर भागात वसलेल्या असून या तिन्ही वस्त्यांमध्ये सुमारे ३० ते ४० हजारांहून लोकवस्ती आहे. या वस्त्या डोंगरावर वसलेल्या असल्याने या उंचावरील भागांमध्ये पाण्याचा पुरवठा योग्य दाबाने होत नाही. परिणामी या भागातील लोकांना पाण्यासाठी प्रचंड वणवण करावी लागते. त्यामुळे या भागातील पाणी समस्या सोडवण्यासाठी मागील काही वर्षांत प्रयत्न होत असला तरी या परिसरातील पाणी समस्या दूर झालेली नाही.

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) लवकरच SBI Clerk परीक्षा २०२५ चे निकाल जाहीर करणार असल्याची शक्यता आहे. मागील वर्षाच्या ट्रेंडनुसार, SBI Clerk पूर्व परीक्षा (Prelims) २०२५ ...
त्यामुळे या परिसरातील पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी महापालिकेच्यावतीने पंपिंग स्टेशन बांधले जाणार आहे तसेच यासंलग्न असलेली जलवाहिनीचीही कामे केली जाणार आहे. यासाठी आता पंपिंग स्टेशनच्या बांधकामासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. या कामासाठी सुमारे विविध करांसह सव्वा तीन कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या कामांसाठी महापालिकेच्या जलअभियंता विभागाच्यातवतीने भारत कंस्ट्रक्शन या कंपनीची निवड केली आहे. माजी आमदार रमेश कोरगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्या आमदारकीच्या काळात येथील पाणी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला होता आणि डोंगरावर योग्य दाबाने पाणी पोहोण्यासाठी पंपिंग स्टेशन बनवण्याची मागणी केली होती. त्यानुसार जर महापालिका प्रशासनाने हे काम हाती घेणार असेल तर एकप्रकारे येथील रहिवाशांचा मोठा विजय आहे,असे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र, या पंपिंग स्टेशनसाठी भांडुपचे आमदार अशोक पाटील यांनी महापालिकेशी वारंवार पाठपुरावा केला होता, त्यामुळे महापालिकेने याची तातडीने निविदा प्रक्रिया राबवून यासाठी कंत्राट कंपनीची निवड केली आहे. त्यामुळे पुढील वर्षभरात या पंपिंग स्टेशनची बांधकाम पूर्ण होईल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
कोणती केली जाणार आहेत कामे
- १० मिटर बाय ०७ मीटर आकाराचे पंपिंग स्टेशन
- ३०० मि मि व्यासाची एकूण १०० मीटर लांबीची जलवाहिनी टाकणे
- ३०० मि मि व्यासाच्या एकूण ६० मीटर लांबीच्या मलनि: सारण वाहिनींचे स्थानांतर करणे
- १ मीटर लांबीचे पर्जन्य जलवाहिनीचे बांधकाम करणे
- ९० मीटर लांबीच्या डांबरी रस्त्याची सुधारणा करणे