Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीMahapareshan : महापारेषणच्या विविध मंजूर प्रकल्पाची कामे तातडीने पूर्ण करावीत

Mahapareshan : महापारेषणच्या विविध मंजूर प्रकल्पाची कामे तातडीने पूर्ण करावीत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई : राज्यात विविध क्षेत्रांसाठीच्या वीजेची मागणी लक्षात घेऊन आवश्यक वीज पुरवठा सुरळीतपणे करण्यासाठी महापारेषणच्या विविध मंजूर प्रकल्पाची काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्दैश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले.

विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित महापारेषण प्रकल्पांबाबत आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हे निर्देश दिले. बैठकीस राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर,आमदार दिलीप वळसे पाटील, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, अप्पर मुख्य सचिव (वने) मिलिंद म्हैसकर, ऊर्जा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव आभा शुक्ला, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल, महापारेषण अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ संजीव कुमार, यांच्यासह इतर संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच संबंधित जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण IPLच्या कॉमेंट्री पॅनलमधून बाहेर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महापारेषणच्या विविध जिल्ह्यातील प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेऊन सर्व ठिकाणची कामे तातडीने विनाविलंब पूर्ण करण्याचे निर्देश दिले.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पालघरमध्ये जास्त प्रमाणात कामे प्रलंबित असून त्या कामांची तातडीने पूर्तता करावी. वाढवणच्या दृष्टीने विचार करुन टीबीसीबी प्लॅनिंग अतंर्गत गतीशक्ती प्लॅटफॉर्मवर त्याच्या नियोजनाचा विचार करावा. तसेच नवी मुंबई डेटा सेंटर हबला ग्रीन पॉवर देण्याच्या अनुषंगाने नियोजन करण्याचे सूचित करुन मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, स्थानिक राजकीय वा इतर कुठल्याही हस्तक्षेपाला न जुमानता सर्व संबंधित यंत्रणांनी ट्रान्समिशन टॉवरच्या उभारणीच्या कामांना गती द्यावी. यासाठी आवश्यक त्या जिल्ह्यांमध्ये पोलिस अधिक्षकांनी पोलिस संरक्षण उपलब्ध करुन द्यावे. सर्व यंत्रणांनी परस्पर सहकार्याने पारेषण प्रकल्पांचे काम गतीने पुढे नेण्याची खबरदारी घेण्याचे मुख्यमंत्री यांनी यावेळी सूचित केले. राज्याच्या वाढीव वीजेची मागणी लक्षात घेता सर्व क्षेत्रांना आवश्यक वीज उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने हे प्रकल्प पूर्ण होणे महत्वाचे आहे, त्यादृष्टीने संबंधित यंत्रणांनी कामांची अंमलबजावणी अधिक गतीमान करुन सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

बैठकीत बभालेश्वर-कुडुस, शिक्रापुर- रांजणगाव, जेजुरी-हिंजवडी, पडघे-वाडा आणि कोलशेत-वाडा, विशविंद-भेंडा, बभालेश्वर-राजूरी-अहिल्यानगर एमआयडीसी, बोईसर(एमआयडीसी)-डहाणू, पडघे वाडा, नागेवाडी-भोकरदन, डहाणू सुर्यानगर एमएमआरडीए आणि कावदास जव्हार,धानोरा यावल ते चोपडा, उमरेड-नागभीड, या वीज वाहिन्यांच्या कामाबाबत आढावा घेण्यात आला. ट्रान्समिशन नेटवर्क विस्तार योजना २०२४-३४ अतंर्गत १,५४,५२२ कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून ८६ हजार ६५६ नवीन कॉरीडॉरचे काम करण्यात येणार आहे. या संदर्भातील कामांच्या नियोजनाबाबत विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी सविस्तर माहिती दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -