आरोपीच्या घराचा अवैध हिस्सा पाडण्यात आला
नागपूर : नागपूर हिंसाचार प्रकरणातील प्रमुख आरोपी फहीम खानच्या घरावर आज, सोमवारी बुलडोझर कारवाई करण्यात आली. नागपूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी फहीमच्या घराचा बेकायदेशीर भाग पाडला. मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा (एमडीपी) नेता असलेल्या फहीम वर १७ मार्च रोजी झालेल्या हिंसाचाराचा मुख्य आरोपी आहे.
या संदर्भात मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, नागपूर हिंसाचाराचा सूत्रधार फहीम खान याच्या घराचा मोठा भाग बेकायदेशीरपणे बांधण्यात आला होता. नागपूरमधील यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत संजय बाग कॉलनीत दंगलखोर फहीम खानने २ मजली इमारत बांधल्याचे तपासात उघड झाले. नागपूर महापालिकेने काल रविवारी त्यांच्या घरातील बेकायदेशीर बांधकाम हटविण्यासाठी नोटीस बजावली होती. आणि त्याला बेकायदेशीर बांधकाम हटविण्यासाठी २४ तासांची मुदत देण्यात आली होती. महापालिकेची नोटीस मिळाल्यानंतर फहीम खानचे कुटुंब घाबरले. त्यानंतर घराला कुलूप लावून त्याचे कुटुंबिय परांगदा झाले. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की फहीमचे कुटुंबिय त्यांच्या नातेवाईकांच्या घरी गेले आहे. त्यामुळे महापालिकेने त्यांच्या अनुपस्थितीत घरातील अवैध बांधकाम जमीनदोस्त केले.
Ajit Pawar : फुले दांपत्याला ‘भारतरत्न’ देण्याचा ठराव – अजित पवार
नागपूर हिंसाचार प्रकरणी नोंदवलेल्या एफआयआर अनुसार फहीम खान हा १७ मार्च रोजी झालेल्या हिंसाचाराचा मुख्य आरोपी आहे. त्यानेच नागरिकांना एकत्र करून हिंसाचार घडवल्याचे एफआयआरमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. याच आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान फहीमच्या घराचा काही भाग अवैध असल्याने महापालिकेने त्याला नोटीस बजावर अवैध भागावर बुलडोजर कारवाई केली.