Wednesday, April 23, 2025
Homeक्रीडा'एमसीए'त कोट्यवधींचा मुद्रांक शुल्क घोटाळा - हेमंत पाटील

‘एमसीए’त कोट्यवधींचा मुद्रांक शुल्क घोटाळा – हेमंत पाटील

मुंबई : देशाला चांगल्या दर्जाचे किक्रेटर देणाऱ्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) भोंगळ कारभाराचे ग्रहण लागले आहे.याच पार्श्वभूमीवर इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी आज धक्कादायक आरोप केला आहे.एमसीए मध्ये कोट्यवधींनाच मुद्रांक शुल्क घोटाळा झाला असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. एमसीए कडून राज्य सरकारला मुद्रांक शुल्क दिला जात नाही.गेल्या ६० वर्षांमध्ये एमसीएकडून एकदाही मुद्रांक कर भरण्यात आलेला नसल्याचा दावा पाटील यांनी केला.

आतापर्यत अनेक सामने असोसिएशनकडून खेळवण्यात आले. अओसे असतांना मुद्रांक शूल्क न भरल्याने यात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.एमसीए च्या मुद्रांक शुल्कासंदर्भात तपास करण्यासाठी सरकारने उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे. अधिवेशन काळात सरकारने चौकशी समितीची घोषणा करावी अन्यथा एमसीए कार्यालयात ठिय्या आंदोलन करू, असा इशारा पाटील यांनी दिला आहे. एमसीए च्या गलथान कारभारावर अध्यक्ष रोहित पवार यांनी वेळीच लक्ष घालण्याची आवश्यकता असल्याचे मत देखील पाटील यांनी व्यक्त केले.

असोसिएशन अंतर्गत अनेक किक्रेट क्लब नोंदणीकृत नाहीत. एमसीए सोबत जुळलेल्या जवळपास ६० पैकी केवळ २५ क्लबच नोंदणीकृत आहेत. अशात अनोंदणीकृत क्लबची नोंदणी होणे आवश्यक आहे.नोंदणीकृत नसतांना देखील या क्लबला एमसीए सोबत का जोडण्यात आले? असा सवाल यानिमित्ताने पाटील यांनी उपस्थित केला आहे.विशेष म्हणजे एमसीएतील कारभाराचा सरकारच्या तिजोरीलाही फटका पडत असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. पुण्यातील गव्हूंजे स्टेडियम समोरील जागा सरकारी असताना देखील या जागेचा वापर एमसीए कडून पार्किंग करीत केला जात आहे.

जागेच्या वापरासंबंधी कुठलाही महसूल सरकारच्या तिजोरीत जमा केला जात नाही, असा आरोप पाटील यांनी केला आहे. अध्यक्ष रोहित पवारांनी याकडे लक्ष घालण्याची मागणी देखील पाटील यांनी केली आहे. एमसीएच्या निवड समितीचा मनमानी कारभार देखील चर्चेचा विषय ठरत आहे. देशासाठी, महाराष्ट्रासाठी चांगले किक्रेटर घडवण्याच्या दृष्टिने काम करणे अपेक्षित असतांना निवड समितीकडून केवळ वशीलीबाजी केली जात असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.एमसीए चे अधिकाऱ्यांचेच पवारांकडून ऐकून घेतले जाते. पंरतू, योग्य कारवाई होत नसल्याचे एमसीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याचे पाटील म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -