Saturday, October 25, 2025
Happy Diwali

Rohit Pawar : केतकी चितळेला विसरले रोहित पवार, कामराला उत्तर देणाऱ्यांवर केली टीका

Rohit Pawar : केतकी चितळेला विसरले रोहित पवार, कामराला उत्तर देणाऱ्यांवर केली टीका
मुंबई : कुणाल कामराच्या कवितेचा व्हिडीओ उद्धव गटाच्या राज्यसभा खासदाराने ट्वीट केला. यानंतर राजकारण तापले. या तापलेल्या राजकारणावर भाष्य करताना रोहित पवार यांनी कुणालाही कविता करण्याचे, राजकीय विषयांवर व्यंगात्मक टीकाटीप्पणीचे स्वातंत्र्य आहे, असे सांगितले. केतकी चितळेच्या विषयाला सोयीस्कर बगल देत रोहित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता असताना केतकी चितळे नावाच्या मराठी अभिनेत्रीने सोशल मीडियात एक पोस्ट केली होती. या पोस्टमधून शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीकाटीप्पणी करण्यात आल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले होते. जेव्हा केतकीची पोस्ट व्हायरल झाली त्यावेळी मविआ सरकारने केतकीला अटक केली होती. केतकी चितळे ४० दिवस तुरुंगात होती. ही कारवाई झाली त्यावेळी रोहित पवार सत्ताधारी गटात होते. हे सगळे विसरुन रोहित पवारांनी कुणाल कामरा प्रकरणावर बोलताना व्यक्तीस्वातंत्र्य हा विषय मांडण्याला प्राधान्य दिले. नेमके काय घडले ? स्टँडअप कॉमेडियन समय रैना वादानंतर कॉमेडियन कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कुणाल कामराने एक कविता केली आहे. या कवितेत थेट कोणत्याही नेत्याचे नाव घेतलेले नाही. पण कवितेतून एकनाथ शिंदे यांच्याकडे अंगुलीनिर्देश करण्यात आला आहे. या कवितेचा व्हिडीओ उद्धव गटाच्या राज्यसभा खासदाराने ट्वीट केला. हा व्हिडीओ पाहून शिवसैनिकांच्या तळपायातील आग मस्तकात गेली. त्यांनी कुणाल कामराच्या सेटची तोडफोड केली. मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल कामराने महाराष्ट्राच्या राजकारणात तीन वर्षांपूर्वी ज्या घडामोडी घडल्या त्यावर भाष्य करत एकनाथ शिंदे यांच्यावर कवितेतून निशाणा साधला. या कवितेचा व्हिडीओ ट्वीट करताना उद्धव गटाच्या राज्यसभा खासदाराने 'कुणाल की कमाल. जय महाराष्ट्र' अशी प्रतिक्रिया शब्दांच्या स्वरुपात ट्वीट केली आहे.
Comments
Add Comment