Friday, April 18, 2025
HomeमहामुंबईVidyavihar Fire : विद्याविहार येथील इमारतीला भीषण आग

Vidyavihar Fire : विद्याविहार येथील इमारतीला भीषण आग

सुरक्षारक्षकाचा होरपळून मृत्यू, एकजण जखमी

मुंबई : विद्याविहार येथील नाथानी मार्गावरील नीलकंठ किंगडम कॉम्प्लेक्सला सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास अचानक आग लागली. या भीषण दुर्घटनेत इमारतीतील सुरक्षारक्षक उदय गांगण (४३) यांचा होरपळून मृत्यू झाला. तसेच, अन्य एक सुरक्षा रक्षक जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, इमारतीला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी प्रयत्न करत आहेत.

नीलकंठ किंगडम कॉम्प्लेक्समधील तक्षशिला या तेरा मजली इमारतीला सोमवारी पहाटे आग लागली. इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आग लागली होती. सर्वजण साखरझोपेत असल्यामुळे आग लागल्याचे कोणाच्या लक्षात आले नाही. हळूहळू आगीची तीव्रता वाढू लागली आणि सुमारे ५ घरांमध्ये आग पसरली. घरात धूर पसरल्याने गाढ झोपेत असलेल्या रहिवाशांना जाग आली व आरडाओरडा करत त्यांनी अन्य रहिवाशांनाही जागे केले.

Nitesh Rane : मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा सरकारचा विचार

वाचण्यासाठी त्यांनी इमारतीबाहेर पळ काढला. मात्र, अनेकांना आग आणि धुरामुळे बाहेर पडता आले नाही. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य हाती घेतले. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना आगीतून बाहेर बाहेर काढले. तसेच, उपचारासाठी जखमींना नजीकच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून दुर्घटनास्थळी अग्निशमन दलातर्फे कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -