Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीBlue potato : मंचरच्या शेतकऱ्याने पिकविला शुगर फ्री निळा बटाटा

Blue potato : मंचरच्या शेतकऱ्याने पिकविला शुगर फ्री निळा बटाटा

जुन्नर : शेतात वेगवेगळे प्रयोग करत चांगले उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आता वाढ होत आहे. यामुळे शेतीतून चांगले उत्पादन घेऊन फायदा करून घेत आहेत. यातच मंचर येथील एका शेतकऱ्याने शेतात शुगर फ्री असलेल्या निळ्या बटाट्याची लागवड करण्याचा प्रयोग केला. शेतकऱ्याचा हा प्रयोग यशस्वी ठरला असून यातून चांगले उत्पादन या शेतकऱ्याला मिळाले आहे. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील प्रगतिशील शेतकरी शांताराम थोरात यांनी शुगर- फ्री निळ्या बटाट्याच्या उत्पादनाचा प्रयोग यशस्वी केला आहे. मंचर परिसर प्रामुख्याने बटाट्याच्या शेतीसाठी ओळखला जातो. बहुतांश शेतकरी बटाट्याचे उत्पादन घेत असून येथील शेतकरी शांताराम थोरात यांनी स्थानिक कृषी तज्ज्ञांच्या मदतीने निळ्या बटाट्याच्या नव्या जातीवर संशोधन सुरू केले. त्यानुसार शेतात लागवड करण्याचा निर्णय घेतला.

Traffic Rules : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांविरोधात कारवाई

हा प्रयोग शेतीतील नवसंशोधनाचा उत्तम नमुना आहे. शुगर-फ्री निळ्या बटाट्यामुळे शेतकऱ्यांना बाजारात वेगळी ओळख मिळेल आणि ग्राहकांना पौष्टिक पर्याय उपलब्ध होईल. या बटाट्याच्या उत्पादनासाठी कमी पाणी आणि सेंद्रिय खतांचा वापर करण्यात आला. ज्यामुळे पर्यावरणपूरक शेतीलाही चालना मिळाली आहे. यशस्वी प्रयोगाची माहिती परिसरातील इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभागाने कार्यशाळांचे आयोजन करण्याचे ठरवले असल्याचे शेतकऱ्याने सांगितले.

मधुमेही रुग्णांसाठी बटाटा फायद्याचा

निळ्या बटाट्याची ही खास जात केवळ रंगाने आकर्षक नाही, तर निळ्या बटाट्याची खासियत म्हणजे त्यात नैसर्गिक साखरेचे प्रमाण अत्यंत कमी आहे. पारंपरिक बटाट्याच्या तुलनेत या जातीत ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. बटाट्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वांचे प्रमाणही जास्त असल्याने त्याला बाजारात चांगली मागणी मिळण्याची अपेक्षा कळंबचे शेतकरी महेश भालेराव यांनी व्यक्त केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -