मुंबई: जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या नेहमी त्रस्त असाल तर काही गोष्टी घरात ठेवणे शुभ मानले जाते. तुम्ही या गोष्टी घरात ठेवत असाल तर लक्ष्मी देवीची कृपा तुमच्यावर राहते.
धन देवता लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर बरसते. त्यांना कधीही आर्थिक तंगीचा त्रास सहन करावा लागत नाही. घरात नारळ ठेवणे अतिशय शुभ मानले जाते. असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्नही होते.
वास्तुशास्त्रानुसार पूजा घरात जर नारळ ठेवला असेल तर त्यामुळे कधीही आर्थिक तंगी जाणवणार नाही. लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने घराची भरभराट होईल. घरात सुख-शांतीचा वास होतो.
यासोबतच नारळ ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा घरात राहते. कुटुंबातील लोकांची प्रगती होते. जर तुम्हाला घरात आनंदीआनंद ठेवायचा असेल तर पुजा घरामध्ये शंभ ठेवू शकता.
वास्तुशास्त्रानुसार आर्थिक समस्या दूर करण्यासाठी पुजा घरात मोरपंखही तुम्ही ठेवू शकता. यामुळे आर्थिक तंगी दूर होईल.