Friday, May 9, 2025

क्रीडाताज्या घडामोडीIPL 2025

विशाखापट्टणममध्ये दिल्ली आणि लखनऊ येणार आमनेसामने

विशाखापट्टणममध्ये दिल्ली आणि लखनऊ येणार आमनेसामने
विशाखापट्टणम : आयपीएलचा चौथा सामना सोमवार २४ मार्च रोजी संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे. विशाखापट्टणम येथे होत असलेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन संघ आमनेसामने असतील. डॉ. वायएस राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम येथे हा सामना रंगणार आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही वाहिन्यांवर आणि जिओ हॉटस्टार अॅपवर सामना बघता येईल. सामन्याची सुरुवात संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून होणार आहे.

आयपीएल २०२५ चे आतापर्यंत तीन सामने झाले. स्पर्धेचा शुभारंभ शनिवार २२ मार्च रोजी झाला. शुभारंभाच्या दिवशी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. बंगळुरूने सामना सात गडी राखून जिंकला. तर रविवार २३ मार्च रोजी राजस्थान रॉयल्सचा पराभव करुन सनरायझर्स हैदराबादने सामना ४४ धावांनी जिंकला. रविवारी संध्याकाळी झालेल्या आयपीएलच्या तिसऱ्या सामन्यात जबरदस्त चुरस बघायला मिळाली. चेन्नई सुपरकिंग्सने मुंबई इंडियन्स विरुद्धचा हा सामना चार गडी राखून जिंकला.

दिल्ली कॅपिटल्स : केएल राहुल (यष्टीरक्षक) , अक्षर पटेल (कर्णधार) , जेक फ्रेझर-मॅकगर्क , फाफ डु प्लेसिस , अभिषेक पोरेल , ट्रिस्टन स्टब्स , आशुतोष शर्मा , मिचेल स्टार्क , कुलदीप यादव , मुकेश कुमार , टी नटराजन , करुण नायर , मोहित जादाल शर्मा , दुष्मंथा चमीरा , अजय जाधव मंडल, दर्शन नलकांडे ,समीर रिझवी , डोनोवन फरेरा , त्रिपुराना विजय , मानवंथ कुमार एल , विपराज निगम , माधव तिवारी

लखनऊ सुपर जायंट्स : रिषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक) , अर्शिन कुलकर्णी , मिचेल मार्श , निकोलस पूरन , आयुष बडोनी , डेव्हिड मिलर , अब्दुल समद , शार्दुल ठाकूर , आरएस हंगरगेकर , रवी बिश्नोई , शमर जोसेफ , आकाश दीप , शाहबाज अहमद , मणिमारन सिद्धार्थ, आकाश महाराज सिंह, एडन मर्कराम, आवेश खान , हिम्मत सिंग , मॅथ्यू ब्रीत्झके , आर्यन जुयाल , युवराज चौधरी , मयंक यादव , प्रिन्स यादव , दिग्वेश राठी
Comments
Add Comment