मुंबई : टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणला यंदाच्या आयपीएल २०२५ च्या सिजनमधील कॉमेंट्री पॅनेलमधून वगळण्यात आले आहे.अनेक भारतीय क्रिकेटपटूंच्या तक्रारींमुळे इरफान पठाणला आयपीएल २०२५ च्या कॉमेंट्री पॅनलमधून वगळण्यात आले असल्याची माहिती समजतं आहे.
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून इरफान पठाण कॉमेंट्री करायचे काम करतो. तो निवृत्ती नंतर कॉमेंट्री पॅनलचा नियमित सदस्य होता. मात्र, इरफान पठाणला आयपीएल २०२५ च्या कॉमेंट्री पॅनेलमधून वगळण्यात आले आहे. इरफानवर लाइव्ह कॉमेंट्री दरम्यान आपला वैयक्तिक अजेंडा राबवल्याचा आरोप आहे. इरफान पठाण हा ऑन-एअर कॉमेंट्री करताना आणि त्याच्या सोशल मीडिया हँडलवर वैयक्तिक अजेंडाबद्दल बोलत असल्याबद्दल खूश नव्हते. बीसीसीआयच्या सूत्राचा हवाला देत अहवालात म्हटले आहे की, ‘काही वर्षांपूर्वी इरफान पठाणचे काही खेळाडूंसोबत भांडण झाले होते. तेव्हापासून तो त्यांच्यावर आक्रमकपणे भाष्य करण्यापासून मागे हटला नाही.’ इरफान पठाणवर सोशल मीडियावर त्या खेळाडूंना टार्गेट केल्याचा आरोप आहे.
त्यानंतर इरफान पठाणने २२ मार्च रोजी स्वतःचे YouTube चॅनल ‘सिधी बात विथ इरफान पठाण’ लाँच केले आहे. यावर तो गेमचे सखोल विश्लेषण करणार आहे. पण , इरफान पठाण कॉमेंट्री पॅनेलतून काढून टाकण्यात आलेला पहिला हाय-प्रोफाइल खेळाडू नाही. २०२० मध्ये, भारताचे माजी फलंदाज संजय मांजरेकर यांनाही काढण्यात आले होते. त्यांनी २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान रवींद्र जडेजा यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टिप्पण्यांबद्दल बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या भारताच्या एकदिवसीय मालिकेच्या कॉमेंट्री पॅनेलमधून वगळले होते.