मुंबई : मुंबईतील गजबजलेला परिसर असलेल्या धारावीमध्ये स्फोटाची मोठी घटना घडली आहे. धारावीत गॅस सिलेंडरने भरलेल्या गाडीचा स्फोट झाला आहे. ही गाडी खरंतर रस्त्याच्या बाजूला उभी होती. या उभ्या असलेल्या गाडीला आग लागली त्यानंतर काही स्फोट झाले.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या आगीला आधी आग लागली. त्यानंतर चार ते पाच स्फोटाचे आवाज ऐकू आले. यामुळे धारावीच्या परिसरातून आगीचे मोठमोठे लोळ उठत आहे. दरम्यान, या दुर्घटनेमुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरूआहेत. धारावीतील लोकांमध्ये दहशतदीचे वातावरण पसरले आहेत.
What’s happening in Bombay!??
This is across Dharavi.
Gas pipeline burst?#bombay #fire #kunalkamra pic.twitter.com/fhKO2rGhz8
— nik (@RealNick05) March 24, 2025