Friday, April 18, 2025
Homeब्रेकिंग न्यूजFahim Khan and Yusuf Shaikh : 'देवाचा न्याय' नागपूर दंगलीच्या मास्टरमाईंडना बुलडोझर...

Fahim Khan and Yusuf Shaikh : ‘देवाचा न्याय’ नागपूर दंगलीच्या मास्टरमाईंडना बुलडोझर दणका

नागपूर : नागपूर दंगलीच्या मास्टरमाईंड फहीम खान आणि युसूफ शेख या दोघांना प्रशासनाने बुलडोझर दणका दिला. फहीम खान आणि युसूफ शेख या दोघांनी केलेले अनधिकृत बांधकाम नागपूर महापालिका प्रशासनाने पाडून टाकले. नागपूर दंगलीच्या मास्टरमाईंडना दिलेला हा पहिला मोठा दणका आहे.

नागपूरमधून संचारबंदी हटवली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी १७ मार्च रोजी नागपुरात झालेल्या दंगलीमागे फहीम शमीम खान या व्यक्तीचा हात आहे. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये फहीम खानने जमाव जमवल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा (एमडीपी) शहराध्यक्ष आहे. नागपूर पोलिसांनी दंगल प्रकरणी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये फहीम खानचे नाव आघाडीवर आहे. त्यानेच सोमवारी १७ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता ३० ते ४० जणांना जमा केले होते. त्यानंतर त्यानेच पोलिसांना विहिंप आणि बजरंग दलाविरोधात निवेदन दिले. पोलिसांनी याबाबत गुन्हाही दाखल केला होता. मात्र, संध्याकाळी फहीम खानने पुन्हा जमाव जमवला आणि तणाव निर्माण केल्याचा आरोप आहे. या दंगलीत फहीम खान मास्टरमाईंड असल्याचा आरोप आहे. फहीम खानवर नागपुरात हिंसा भडकवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. लोकांना हिंसेसाठी चिथावणी दिल्याचाही आरोप त्याच्यावर आहे.

तपास करुन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३८ वर्षांच्या फहीम खानने दहावी पर्यंतचेच शिक्षण घेतले आहे. तो राजकारणात सक्रीय आहे. लोकसभा निवडणुकीत फहीम खान नितीन गडकरींच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांपैकी एक होता. निवडणुकीत गडकरी विजयी झाले आणि त्यांच्या विरोधातील फहीमसह सर्व उमेदवारांचा पराभव झाला. निवडणुकीनंतर फहीम खान आता दंगलीच्या निमित्ताने पुन्हा चर्चेचा विषय झाला आहे.

पोलिसांच्या एफआयआरमध्ये फहीम खानने जमाव जमवल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा (एमडीपी) शहराध्यक्ष आहे. पोलिसांनी फहीम आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला आहे. आतापर्यंत नागपूर दंगल प्रकरणी १०४ आरोपींची ओळख पटविण्याचे काम झाले आहे. यातील ९२ आरोपींविरुद्ध कारवाई सुरू आहे. इतर १२ आरोपी अल्पवयीन आहेत, त्यांच्या विरोधात बाल गुन्हेगारांसाठीच्या कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई होणार आहे. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि इतरांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवरही कारवाई सुरू आहे. दंगल करुन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांकडूनच दंड रुपाने वसुली करुन सरकार हानीची भरपाई करणार आहे. ज्यांची दंड देण्याची ऐपत नाही अशा आरोपींची मालमत्ता विकून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया सुर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -