Wednesday, April 23, 2025
Homeमहत्वाची बातमीAamir Khan : आमिर खानने घेतली संतोष देशमुखांच्या मुलांची भेट

Aamir Khan : आमिर खानने घेतली संतोष देशमुखांच्या मुलांची भेट

पुणे : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांचा विश्वासू वाल्मिक कराड तसेच त्याचे सहकारी तुरुंगात आहेत. या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे. संतोष देशमुख यांची ज्या क्रूरपणे हत्या करण्यात आली ते पाहून अनेकांना धक्का बसला आहे. न्यायालयात खटला सुरू आहे. संतोष देशमुख यांचे लहान भाऊ धनंजय देशमुख आणि मस्साजोगचे ग्रामस्थ न्यायासाठी पाठपुरावा करत आहेत. या पार्श्वभूमीवर बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याने देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी आमिरने देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन केले. आमिर खान संतोष देशमुख यांच्या मुलांना भेटला.

पुण्यातील बालेवाडी स्टेडियम येथे रविवार २३ मार्च रोजी पाणी फाऊंडेशनचा कार्यक्रम झाला. पाणी फाऊंडेशनचा फार्मर कप पुरस्कार वितरण सोहळ्याचा हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि संतोष देशमुख यांचा लहान मुलगा विराजही उपस्थित होते. यावेळी अमिर खान आणि किरण राव यांनी संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुख आणि धनंजय देशमुख यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

आमिर खानने धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा केली. देशमुख कुटुंबाची विचारपूस केली. आमिर खानशी बोलत असताना धनंजय देशमुखांचे डोळे पाणावले होते. आमिर खान यांनी खांद्यावर हात ठेवत त्यांना धीर दिला. तसेच, विराज देशमुखला जवळ घेत कडकडून मिठी मारली. यावेळी आमिर खानच्या डोळ्यातही पाणी होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -