Monday, May 5, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Noida Breaking News : गायीच्या दुधामुळे महिलेचा मृत्यू

Noida Breaking News : गायीच्या दुधामुळे महिलेचा मृत्यू

नोएडा : उत्तरप्रदेशातील ग्रेटर नोएडामधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका ४० वर्षीय महिलेने गायीचं कच्चं दूध प्यायल्याने तिचा मृत्यू झाला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून या घटनेने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडा येथील जेवरमधील थोरा गावातील एका ४० वर्षीय महिलेने गायीचं कच्चं दूध सेवन केल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या घटनेचा तपास केल्यानंतर निष्पन्न झालेल्या माहितीत असे आढळून आले की दूध सेवन केलेल्या गायीला रेबीज झाला होता. दूध देण्याच्या काही दिवस आधी या गायीला कुत्रा चावला होता. त्यामुळे गायीच्या शरीरात विष पसरले. गायीची प्रकृती ढासळत होती. त्यातच दोन महिन्यापूर्वी तिने वासराला जन्म दिला. परंपरेनुसार, गायीचे पहिले दूध गावात वाटले गेले. गायीची प्रकृती अधिक खराब होऊ लागल्यानंतर पशु चिकित्सककडून तपासणी करण्यात आली. त्यामध्ये गायीला रेबीजचे संक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गायीचे दूध पिणाऱ्यांना रेबीजचे इंजेक्शन घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.

गायीच्या मालकिणीने आणि कुटुंबाने तात्काळ रेबीजचे इंजेक्शन घेतलं. पण शेजारी राहणाऱ्या ४० वर्षीय सीमा यांनी इंजेक्शन घेतलं नाही. काही दिवसानंतर सीमा यांची प्रकृती बिघडली. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण त्यांचा उपचारावेळी मृत्यू झाला. डॉक्टरांच्या रिपोर्ट्सनुसार, सीमा यांचा मृत्यू रेबीजमुळे झाला.

Comments
Add Comment