Tuesday, April 8, 2025
Homeताज्या घडामोडीचक्क पतीनेच केले पत्नीचे अपहरण...

चक्क पतीनेच केले पत्नीचे अपहरण…

नाशिक : वैदिक पद्धतीने लग्न केल्यानंतर १९ वर्षीय पत्नी किरकोळ कारणावरून नवऱ्याशी न पटल्याने माहेरी गेली.‌ आईमुळेच बायको नांदायला येत नसल्याचा पतीचा समज झाला. त्याच रागातून त्याने आई सोबत रस्त्याने पायी जाणाऱ्या पत्नीचे तीन मित्रांसह एका कारमधून अपहरण केल्याची घटना तालुक्यातील पांगरी येथे दोन दिवसांपूर्वी घडली. दरम्यान, अपहृत नवरी सह तिच्या पतीला पोलिसांनी शिर्डी येथून ताब्यात घेत अटक केली आहे. भविष्याचा विचार करून दोन्ही बाजूकडून या प्रकरणी समेट घडवत पडदा टाकण्यात आला.

दुसरीकडे पोलिसांची मात्र या प्रकरणी चांगलीच दमछाक झाली. त्यामुळे या अनोख्या अपहरणाची चर्चा परिसरात रंगली आहे. पांगरी येथील एका १९ वर्षीय तरुणीने आई-वडिलांच्या इच्छे विरोधात २० जानेवारी २०२५ रोजी गावातीलच वैभव अण्णासाहेब पवार (२३) या तरुणाशी वैदिक पद्धतीने विवाह केला. ती त्याच्या सोबतच राहत असताना अचानक दोघांमध्ये किरकोळ भांडण झाले. त्यातून ती माहेरी आली. ती पुन्हा सासरी येत नसल्याचे बघून नवऱ्याने तीन मित्रांना सोबत घेत पांगरी बस स्थानक परिसरात ही मुलगी आई आणि भावासोबत पायी जात असताना आईला ढकलून देत मुलीला कारमध्ये घालून तीचे अपहरण केले. दरम्यान, अपहरणाचा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला. वावी पोलिसांना या संदर्भात माहिती देण्यात आल्यानंतर त्यांच्याकडूनही तपास चक्र वेगाने फिरली.

अशातच तरुणाने या मुलीला प्रारंभी संगमनेर येथे कारने नेत तेथे तिला उतरून घेत तीन मित्रांना कारसह माघारी पाठवून दिले. त्यानंतर या पती-पत्नीने बसने लोणी आणि नंतर शिर्डी येथे प्रवास केला. तिथून ते गावी परतत असताना वावी पोलिसांनी त्यांचे लोकेशन ट्रॅक करत शिर्डी येथून त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर मुलीच्या फिर्यादीवरून नवऱ्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. या संदर्भात वावी पोलिसांनी तरुणाला अटक केली असून त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, रागा वैतागत नवऱ्याविरोधात अपहरणाची फिर्याद दिलेली मुलगीच गजाआड असलेल्या पतीला जेवणाचा डबा घेऊन आल्याने पोलिसांना डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली. अपहरणात त्याला मदत करणाऱ्या तीन संशयीतांचा शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -