मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचा २०२० साली निधन झाले होते. सुशांत सिंहने गळफास घेतला असून याप्रकरणाखाली रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि तिच्या कुटुंबाला आरोपी ठरवले जात होते. दरम्यान, आता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात कोणालाही दोषी ठरवले नसून सीबीआयने (CBI) रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला क्लीन चिट दिली आहे.
Yashwant Verma : न्यायाधीशांच्या घरी सापडलेल्या नोटांच्या घबाडाचा व्हिडिओ आला समोर!
मिळालेल्या माहितीनुसार, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर (Sushant Singh Rajput Case) सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर केलेले आरोप आणि रियाने सुशांतच्या कुटुंबावर केलेले आरोप या दोन्ही प्रकरणांमध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. ऑगस्ट २०२० मध्ये सीबीआयने सुशांत प्रकरण ताब्यात घेतले आणि तपास सुरू केला. ४ वर्षांच्या तपासानंतर, सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. त्यानुसार रिया आणि तिच्या कुटुंबाला क्लीन चिट देण्यात आली आहे. सुशांतला कोणीतरी आत्महत्या करण्यास भाग पाडले होते हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा सीबीआयला सापडला नाही.
‘हा राखून होता, हे सिद्ध करण्याइतपत कोणताही तोंडी किंवा भौतिक पुरावा आम्हाला सापडलेला नाही. सुशांतच्या बहिणीने त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे तिची चौकशी करण्यासाठी सीबीआयने इतके दिवस वाट पाहिली. पण ती सीबीआयसमोर हजर राहिली नाही. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात वैज्ञानिक पुराव्यांमधूनही कोणताही गैरप्रकार दिसून आला नाही. त्यामुळेच अखेर पाच वर्षांनी क्लोजर रिपोर्ट दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला,” असे सीबीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.
पुराव्यात कसलीही छेडछाड नाही
सीबीआयने सुशांतच्या आत्महत्येचा तपास एम्सच्या तज्ज्ञांकडून करून घेतला होता. या प्रकरणात, एम्सच्या फॉरेन्सिक टीमने कोणताही गैरप्रकार केला नसून सोशल मीडिया चॅट्स एमएलएटी द्वारे चौकशीसाठी अमेरिकेला पाठवण्यात आल्या. त्या तपासात चॅट्समध्ये कसलीही छेडछाड न झाल्याचे समोर आले आहे.
सीबीआयच्या अहवालात काय म्हटलं आहे?
- सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली होती, त्याला आत्महत्येसाठी कोणीही जबरदस्ती केली नाही.
- रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला क्लीन चिट मिळाली.
- या प्रकरणी कोणताही गुन्हेगारी अँगल किंवा ‘फाऊल प्ले’ आढळला नाही.
- AIIMS फॉरेन्सिक टीमनेही हत्येची शक्यता नाकारली.
- सोशल मीडिया चॅट्स अमेरिकेत पाठवून तपास केला. त्यामध्ये छेडछाड केल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही.