Thursday, April 17, 2025
Homeक्रीडाIPL 2025सुपर संडे, रविवारी हैदराबाद आणि चेन्नईत रंगणार आयपीएलचे सामने

सुपर संडे, रविवारी हैदराबाद आणि चेन्नईत रंगणार आयपीएलचे सामने

हैदराबाद : आयपीएल २०२५ चा शनिवार २२ मार्च रोजी शुभारंभ झाला. पहिल्या दिवशी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धचा सामना सात गडी राखून जिंकला. आयपीएलच्या पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने २० षटकांत आठ बाद १७४ धावा केल्या तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १६.२ षटकांत तीन बाद १७७ धावा केल्या. आता रविवार २३ मार्च रोजी आयपीएलचा दुसरा आणि तिसरा सामना होणार आहे. आज सुपर संडे आहे कारण एकाच दिवशी आयपीएलचे दोन सामने होणार आहेत.

IPL 2025: ६७ धावा आणि ७ विकेट्स…कुणालच्या फिरकीनंतर साल्ट-कोहलीचे वादळ, RCBसमोर KKR उद्ध्वस्त

हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना दुपारी साडेतीन वाजल्यापासून सुरू होणार आहे. हा आयपीएल २०२५ मधील दुसरा सामना आहे. यानंतर संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून आयपीएलचा तिसरा सामना सुरू होत आहे. चेन्नईत होत असलेल्या या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स एकमेकांविरोधात मैदानात उतरतील. हा सामना चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही वाहिन्यांवर आणि जिओ हॉटस्टार या अॅपवर बघता येतील.

सनरायझर्स हैदराबादवर खिळल्या नजरा

सनरायझर्स हैदराबाद : हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक) , पॅट कमिन्स (कर्णधार) , अभिषेक शर्मा , ट्रॅव्हिस हेड , इशान किशन , नितीश कुमार रेड्डी , अभिनव मनोहर , सचिन बेबी , हर्षल पटेल , ॲडम झाम्पा , मोहम्मद शमी , राहुल चहर , जयदेव उनाडकट , कमिंदु मेंडिस , झीशान अन्सारी, विआन मुल्दर, अथर्व तायडे , सिमरजीत सिंग , एशान मलिंगा , अनिकेत वर्मा

राजस्थान रॉयल्स : रियान पराग (कर्णधार) , ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक) , यशस्वी जैस्वाल , संजू सॅमसन , नितीश राणा , शिमरॉन हेटमायर , शुभम दुबे , वानिंदू हसरंगा , जोफ्रा आर्चर , तुषार देशपांडे , संदीप शर्मा , फजलहक फारुकी , कुमार कार्तिकेय, आकाश मढवाल, युधवीर सिंग चरक, महेश थेक्षाणा, क्वेना मफाका , अशोक शर्मा , वैभव सूर्यवंशी , कुणाल सिंग राठोड

चेन्नई सुपरकिंग्स : ऋतुराज गायकवाड (कर्णधार) , एमएस धोनी (यष्टीरक्षक) , डेव्हॉन कॉनवे , रचिन रवींद्र , विजय शंकर , रवींद्र जडेजा , शिवम दुबे , सॅम कुरन , रविचंद्रन अश्विन , मथीशा पाथीराना , कमलेश नागरकोटी , नॅथन एलिस , मुकेश चौधरी, राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, खलील अहमद , जेमी ओव्हरटन , शेख रशीद , अंशुल कंबोज , श्रेयस गोपाल , नूर अहमद , गुर्जपनीत सिंग , रामकृष्ण घोष , आंद्रे सिद्धार्थ सी , वंश बेदी

मुंबई इंडियन्स : सूर्यकुमार यादव (कर्णधार) , रॉबिन मिन्झ (यष्टीरक्षक) , रोहित शर्मा , विल जॅक्स , तिलक वर्मा , नमन धीर , रायन रिकेल्टन , मिचेल सँटनर , जसप्रीत बुमराह , रीस टोपले , ट्रेंट बोल्ट , दीपक चहर , कॉर्बिन बॉश , मुजीब उर रहमान, हार्दिक पांड्या, क्रिष्णन श्रीजीथ, कर्ण शर्मा , राज बावा , अर्जुन तेंडुलकर , बेव्हॉन जेकब्स , अश्वनी कुमार , सत्यनारायण राजू , विघ्नेश पुथूर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -