Tuesday, April 29, 2025
Homeताज्या घडामोडीST Bus : बस चालवत मोबाईलवर मॅच बघणाऱ्या चालकाला एसटीने केले बडतर्फ!

ST Bus : बस चालवत मोबाईलवर मॅच बघणाऱ्या चालकाला एसटीने केले बडतर्फ!

मुंबई : राज्यभरात बस (Bus Accident) अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. हे प्रकार रोखण्यासाठी प्रशासन पाऊल उचलत आहे. अशातच आता बस चालवत मोबाईलवर क्रिकेट मॅच बघणाऱ्या खासगी चालकाची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या संदर्भात एसटी प्रशासनाने बडतर्फ केले असून संबंधित खाजगी कंपनीला दंड ठोठावला आहे. मात्र या प्रकारामुळे प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (ST Bus Viral Video)

Malvani Bhasha Bhavan : कोकणात लवकरच ‘मालवणी भाषा भवन’ उभारणार

२१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता दादर येथून स्वारगेट (पुणे) साठी निघालेल्या खाजगी ई-शिवनेरी बसमधील चालक रात्री लोणावळा जवळ बस चालवत क्रिकेट मॅच पाहत असलेले चित्रीकरण संबंधित बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांना पाठवले. याबाबत मंत्री सरनाईक यांनी तातडीने एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

त्यानुसार एसटीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी संबंधित खाजगी संस्थेच्या चालकास प्रवाशांचा जीव धोक्यात घालून बेशिस्त वाहनं चालवल्या प्रकरणी बडतर्फ केले असून संबंधित खाजगी संस्थेला ₹ ५०००/- इतका दंड ठोठावला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार एसटी महामंडळाने ही कारवाई केली आहे.

यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की ई-शिवनेरी ही एसटीची मुंबई -पुणे मार्गावर धावणारी प्रतिष्ठित बस सेवा आहे. या बसमधून अनेक सन्माननीय व्यक्ती प्रवास करीत असतात. ” अपघातविरहित सेवा ” हा या बस सेवेचा नावलौकिक आहे. त्यामुळे अशा प्रकारे बेशिस्त वाहन चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकांच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रवाशांचा एसटीच्या या प्रतिष्ठित सेवेबद्दल विश्वास दृढ होत जाईल! तसेच भविष्यात एसटीकडे असलेल्या खाजगी बसच्या चालकांना संबंधित संस्थेकडून वेळोवेळी शिस्तबद्ध वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -