World Meteorological Day : झाडांशी सलोखा जपू या...

  39

मुंबई (मानसी खांबे) : २३ मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. मागील काही वर्षांपासून हवामान बदलामुळे मानव जातीसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर या दिवसाचे महत्त्व अधिकच अधोरेखित होते. २३ मार्च १९५० रोजी जागतिक हवामान संस्था स्थापन झाली होती. दरवर्षी जागतिक हवामान दिनाची थीम वेगवेगळी ठरविण्यात येते. त्यानुसार यंदाची थीम "Closing the early warning gap together" ही आहे. गेल्या काही वर्षांत, उष्णकटिबंधीय चक्रीवादळे, दुष्काळ, अतिवृष्टी आणि उष्णतेच्या लाटा यासारख्या नैसर्गिक आपत्तींसह हवामान बदल तीव्र होत चालला आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून यंदा हवामान बदल आणि अत्यंत हवामान घटनांचे परिणाम कमी करण्यासाठी लवकर इशारा प्रणालींचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ही थीम ठेवण्यात आली आहे.
अलिकडच्या काही वर्षांत मुंबईतील तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. सूर्य देव आग ओकत आहे. दुपारच्या सुमारास उष्णतेच्या लाटा अगांची अक्षरश: लाहीलाही करतात. उन्हाळा ऋतुही वाढत आहे. तुलनेत हिवाळा ऋतू अगदीच कमी होत चालला आहे. राज्यात अवकाळी धुमाकूळ घालत आहे. ग्लोबल वार्मिंगचा फटका बसायला सुरुवात झाली आहे. तापमान वाढीमुळे शहरे होरपळत आहेत.



जगात शहरीकरणाची जणू स्पर्धाच रंगली आहे. लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क या शहरांचा माग अविकसित, विकसनशील देशांतील शहरे घेत आहेत. जगात अशी चकचकीत शहरेच्या शहरे विकसित केली जात आहेत. शहरीकरणाच्या या पाठलागात वनीकरणावर कुऱ्हाड चालवली जात आहे. आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या उंचच्या उंच इमारती, काचेची घरे, महामार्ग, मेट्रो रेल्वे यांच्या उभारणीत झाडांची कत्तल केली जात आहे. जलद आणि सोयीस्कर महामार्ग बांधताना समुद्र, पृथ्वीच्या पोटात हात घातला जात आहे. औद्योगीकरणात झपाट्याने वाढ होत असताना प्रदूषणातही वाढ होत आहे. बांधकाम, इमारतीकरण, वाहतुकीची साधने यामुळे हवा प्रदूषणात भर पडत आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्राच्या पाणी पातळीत वर्षागणीक वाढ होत आहे. जल प्रदूषण रोखण्यात अनेक देश अपयशी ठरत आहेत. त्याचे परिणाम हवामान बदलात दिसत आहेत. त्यामुळे आता तरी डोळे उघडा. वृक्षतोड थांबवा.


झाडे रुजून येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यासाठी किमान माती असणे गरजेचे आहे. मुंबईसारख्या शहरात माती शिल्लक आहे कुठे. मुंबई म्हणजे सिमेंट काँक्रीटचे जंगल झाले आहे. हा काँक्रीटचा विस्तार थांबवा. शक्य तितका भाग मातीचा राहुदे. मग त्यात पावसाचे पाणीही मुरेल. जपानच्या धर्तीवर मियवाकी ही कमीत कमी जागेतली घनदाट जंगले तयार करुया. प्रगती करताना पर्यावरणाशी सांगड घालूया. प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करू या. झाडे हा पर्यावरणाच्या साखळीतील महत्त्वाचा दुवा आहे. त्याला आपल्या आप्तेष्टांप्रमाणे जपू या. त्याचा परिणाम हमखास पर्यावरणावर होईल. अन्यथा अवकाळी, तापमानवाढ हे पर्यावरणाचे इशारे आहेत. ते वेळीच ऐकले नाहीत, तर पुढे अधिक घातक होईल.

Comments
Add Comment

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे ९ महत्वाचे निर्णय !

विमुक्त जाती व भटक्या जमातीतील लाभार्थ्यांसाठी विविध योजनांची कार्यपद्धती प्रभावीरित्या

न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ, जरांगे मुंबईत येणार की नाही येणार लवकरच ठरणार

मुंबई : फडणवीस सरकारच्या निर्देशानुसार मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक मंत्रालयात झाली. उपसमितीचे

'अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे'

मुंबई : मराठवाड्यातील ग्रामीण भागासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी, यासाठी बीड जिल्ह्यातील

'दिवेआगरच्या सुपारी संशोधन केंद्राची कामे लवकर सुरू करा'

मुंबई : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथील प्रस्तावित १४ कोटी रु.ची तरतुद असलेल्या सुपारी संशोधन केंद्राचे काम

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय महाविद्यालय उभारण्याची योजना

मुंबई : मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड, मौजे सौंदाळे, जामसंडे येथे शासकीय

'नांदेड-मुंबई ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ ने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार'

मुंबई : मराठवाड्याच्या विकासासाठी शासन दळणवळण सुविधांवर भर देत आहे. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मुळे नांदेड शहर