Thursday, April 17, 2025
Homeताज्या घडामोडीWorld Meteorological Day : झाडांशी सलोखा जपू या...

World Meteorological Day : झाडांशी सलोखा जपू या…

मुंबई (मानसी खांबे) : २३ मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. मागील काही वर्षांपासून हवामान बदलामुळे मानव जातीसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर या दिवसाचे महत्त्व अधिकच अधोरेखित होते. २३ मार्च १९५० रोजी जागतिक हवामान संस्था स्थापन झाली होती. दरवर्षी जागतिक हवामान दिनाची थीम वेगवेगळी ठरविण्यात येते. त्यानुसार यंदाची थीम “Closing the early warning gap together” ही आहे. गेल्या काही वर्षांत, उष्णकटिबंधीय चक्रीवादळे, दुष्काळ, अतिवृष्टी आणि उष्णतेच्या लाटा यासारख्या नैसर्गिक आपत्तींसह हवामान बदल तीव्र होत चालला आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून यंदा हवामान बदल आणि अत्यंत हवामान घटनांचे परिणाम कमी करण्यासाठी लवकर इशारा प्रणालींचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ही थीम ठेवण्यात आली आहे.
अलिकडच्या काही वर्षांत मुंबईतील तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. सूर्य देव आग ओकत आहे. दुपारच्या सुमारास उष्णतेच्या लाटा अगांची अक्षरश: लाहीलाही करतात. उन्हाळा ऋतुही वाढत आहे. तुलनेत हिवाळा ऋतू अगदीच कमी होत चालला आहे. राज्यात अवकाळी धुमाकूळ घालत आहे. ग्लोबल वार्मिंगचा फटका बसायला सुरुवात झाली आहे. तापमान वाढीमुळे शहरे होरपळत आहेत.

Aagra : आग्र्यातील शिवस्मारकाची पर्यटन विभागाकडे जबाबदारी

जगात शहरीकरणाची जणू स्पर्धाच रंगली आहे. लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क या शहरांचा माग अविकसित, विकसनशील देशांतील शहरे घेत आहेत. जगात अशी चकचकीत शहरेच्या शहरे विकसित केली जात आहेत. शहरीकरणाच्या या पाठलागात वनीकरणावर कुऱ्हाड चालवली जात आहे. आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या उंचच्या उंच इमारती, काचेची घरे, महामार्ग, मेट्रो रेल्वे यांच्या उभारणीत झाडांची कत्तल केली जात आहे. जलद आणि सोयीस्कर महामार्ग बांधताना समुद्र, पृथ्वीच्या पोटात हात घातला जात आहे. औद्योगीकरणात झपाट्याने वाढ होत असताना प्रदूषणातही वाढ होत आहे. बांधकाम, इमारतीकरण, वाहतुकीची साधने यामुळे हवा प्रदूषणात भर पडत आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्राच्या पाणी पातळीत वर्षागणीक वाढ होत आहे. जल प्रदूषण रोखण्यात अनेक देश अपयशी ठरत आहेत. त्याचे परिणाम हवामान बदलात दिसत आहेत. त्यामुळे आता तरी डोळे उघडा. वृक्षतोड थांबवा.

झाडे रुजून येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यासाठी किमान माती असणे गरजेचे आहे. मुंबईसारख्या शहरात माती शिल्लक आहे कुठे. मुंबई म्हणजे सिमेंट काँक्रीटचे जंगल झाले आहे. हा काँक्रीटचा विस्तार थांबवा. शक्य तितका भाग मातीचा राहुदे. मग त्यात पावसाचे पाणीही मुरेल. जपानच्या धर्तीवर मियवाकी ही कमीत कमी जागेतली घनदाट जंगले तयार करुया. प्रगती करताना पर्यावरणाशी सांगड घालूया. प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करू या. झाडे हा पर्यावरणाच्या साखळीतील महत्त्वाचा दुवा आहे. त्याला आपल्या आप्तेष्टांप्रमाणे जपू या. त्याचा परिणाम हमखास पर्यावरणावर होईल. अन्यथा अवकाळी, तापमानवाढ हे पर्यावरणाचे इशारे आहेत. ते वेळीच ऐकले नाहीत, तर पुढे अधिक घातक होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -