Tuesday, April 29, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणरायगड जिल्ह्यातील धक्कादायक घटना, चिमुरडीवर अत्याचार प्रकरणी हमजाला अटक

रायगड जिल्ह्यातील धक्कादायक घटना, चिमुरडीवर अत्याचार प्रकरणी हमजाला अटक

रायगड : महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातल्या गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली. एका चिमुरडीवर अत्याचार केल्याप्रकरणी हमजा यासीन दाभीळकर याला अटक करण्यात आली आहे. पोलीस तपास सुरू आहे. हमजा विरोधात कायदेशीर कारवाई करताना कोणतीही उणीव राहू नये यासाठी पोलीस बारकाईने तपास करत आहेत.

डिस्नेलँड फिरवून आणल्यावर आईने केली मुलाची हत्या

हमजा यासीन दाभीळकर या ८० वर्षांच्या नराधमाने तीन वर्षांच्या चिमुरडीला चॉकलेटचे आमिष दाखवून घरात बोलावले. यानंतर मुलीवर अत्याचार केले. ही घटना १७ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी घडली. हमजा यासीन दाभीळकर याने आपल्या राहत्या घरात चिमुरडीवर अत्याचार केले. या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवून हमजा यासीन दाभीळकर याला अटक केली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी हमजा विरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत (Protection of Children from Sexual Offences Act / POCSO Act) कारवाई सुरू आहे.  आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -