Tuesday, April 29, 2025

क्रीडाताज्या घडामोडीIPL 2025

IPL 2025: आयपीएलमध्ये विजयासह हैदराबादची सुरूवात

IPL 2025: आयपीएलमध्ये विजयासह हैदराबादची सुरूवात

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील दुसऱ्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात टक्कर झाली. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रंगलेल्या सामन्यात हैदराबादने ४४ धावांनी विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सला विजयासाठी २८७ धावांचे आव्हान मिळाले होते याचा पाठलाग करताना त्यांना ६ बाद २४२ धावा करता आल्या.

मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या राजस्थान रॉयल्सची सुरूवात खराब राहिली. त्यांनी दुसऱ्याच ओव्हरमध्ये दोन विकेट गमावल्या. वेगवान गोलंदाज सिमरजीत सिंहने पहिल्यांदा यशस्वी जायसवालला बाद केले. त्यानंतर कर्णधार रियान परागही स्वस्तात बाद झाला. त्यानंतर मोहम्मद शमीने नितीश राणाला बाद केले. यामुळे राजस्थानचा स्कोर तीन विकेटवर ५० होता. संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेलने मिळून डाव सांभाळला. दोघांनी १११ धावांची भागीदारी केली. या पार्टनरशिपला हर्षल पटेलने तोडले, त्याला संजू सॅमसनने बाद केले.

संजू सॅमसनने ३७ बॉलवर ६६ धावा केल्या. यात सात चौकार आणि चार षटकारांचा समावेश आहे. त्यानंतर स्पिनर एडम झाम्पाने जुरेलची इनिंग्स संपवली. जुरेलने २००च्या स्ट्राईक रेटने ७० धावा केल्या.

सनरायजर्स हैदराबादने केला दुसरा स्कोर, इशान किशनचे शतक

सामन्यात सनरायजर्स हैदराबादने टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करताना ६ बाद २८६ धावा केल्या. हा आयपीएलच्या इतिहासातील एखाद्या संघाचा दुसरा मोठा स्कोर होता. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा स्कोर सनरायर्स हैदराबादनेही बनवला आहे. इशानने ४६ बॉलमध्ये नाबाद १०६ धावा केल्या. या दरम्यान इशान किशनने ११ चौकार आणि ६ षटकार ठोकला आहे.

Comments
Add Comment