Saturday, April 19, 2025
Homeक्रीडाIPL 2025IPL 2025: ६७ धावा आणि ७ विकेट्स...कुणालच्या फिरकीनंतर साल्ट-कोहलीचे वादळ, RCBसमोर KKR...

IPL 2025: ६७ धावा आणि ७ विकेट्स…कुणालच्या फिरकीनंतर साल्ट-कोहलीचे वादळ, RCBसमोर KKR उद्ध्वस्त

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग(IPL) २०२५चा पहिला सामना २२ मार्चला शनिवार कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात आरसीबीने सात विकेटनी विजय मिळवला. आरसीबीच्या विजयात कृणाल पांड्या, फिल साल्ट आणि विराट कोहली यांची भूमिका महत्त्वाची ठरली. कृणाल पांड्याने आपल्या गोलंदाजीने कहर केला. तर साल्ट आणि कोहलीने फलंदाजीमध्ये केकेआरच्या गोलंदाजांना धुतले.

नरेनच्या विकेटनंतर अडखळली केकेआर

ईडन गार्डन्सच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा संघ एकवेळेस मोठ्या स्कोरच्या दिशेने जात होता. त्यांचा स्कोर ९.५ षटकांत एक विकेट बाद १०७ इतका होता. तेव्हा असे वाटत होते की केकेआर २००चा टप्पा गाठेल. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि सुनील नरेन यांनी चौकार-षटकारांचा पाऊस सुरू ठेवला होता. दरम्यान, त्यानंतर खेळ पूर्णपणे पालटला. कृणालच्या फिरकीसमोर केकेआरचे काही चालेना. त्यांचे विकेट पडण्यास सुरूवात झाली. यामुळे केकेआर बॅकफूटवर आली. केकेआरला आरसीबीसमोर १७५ धावांचे आव्हान दिले.

१७५ धावांचे आव्हान पार करणे इडन गार्डन्सच्या मैदानावर कठीण होते. १७५ धावांचे आव्हान पार करणे इडन गार्डन्सच्या मैदानावर कठीण होते. तेही रात्रीच्या वेळेस मैदानावर ओस पडत असताना. केकेआरला सुरूवातीला विकेट्सची आशा होती. मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरूवात धमाकेदार राहिली. विराट कोहली आणि फिल साल्टने मिळून केकआरच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दोघांनी ५१ बॉलवर ९५ धावांची भागीदारी झाली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -