
/>
उत्तरप्रदेशच्या धर्तीवर महाकुंभसाठी कायदा केला जाईल. गोदावरी प्रदुषणमुक्तीसाठी पुढील महिन्यांपासून काम सुरू होईल. नाशिकप्रमाणे त्र्यंबकेश्वरचाही विकास केला जाईल. उत्तर प्रदेश येथे महाकुंभसाठी कायदा तयार करण्यात आला, आपणही तसाच कायदा करणार आहोत; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
/>
कुंभमेळ्यासाठी नाशिक जिल्ह्यात ११ पूल तयार करण्याचा निर्णय झाला आहे. नवीन घाट बनवण्यात येतील. एसटीपीचे जाळे तयार करून पाणी शुद्धीकरणाचे काम केले जाईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. कोणत्याही प्राधिकरणात साधू महंत नाहीत. प्रशासकीय कामांमध्ये सरकारी अधिकारी त्यांची जबाबदारी पार पाडतील. तर कुंभमेळ्याची अध्यात्मिक बाजू ही साधूमहंत हाताळतील; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. कुंभमेळ्यासाठी मेळा प्राधिकरण हे प्रशासकीय प्राधिकरण म्हणून काम करेल; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.