नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश (Yashwant Verma) यांच्या शासकीय निवासस्थानी होळीच्या दिवशी आग लागल्याची घटना घडली होती. यादरम्यान आग विझविण्यासाठी अग्निशामक दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांच्या घरातील एका खोलीत नोटांचा ढिगारा आढळून आला होता. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली असून सदर प्रकरण भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांना समजल्यानंतर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. दरम्यान, सुर्पीम कोर्टाने (Supreme Court) न्यायाधीशांच्या घरी सापडलेल्या जळक्या घबाडाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
Shivshahi Buses : उन्हाळी सुट्ट्यांमध्ये ८७२ वातानुकूलित शिवशाही बसेस धावणार
मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रीम कोर्टानं नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कायम रहावा म्हणून आणि पारदर्शकता राखण्यासाठी न्यायाधीश यशवंत वर्मा (Yashwant Verma) यांच्या घरी लागलेल्या आगीत जळालेल्या नोटांच्या प्रकरणातील सर्व कागदपत्रे सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत. काल रात्रीच्या सुमारास सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर जळक्या नोटांचा व्हिडिओ शेअर केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडलं आहे की एखाद्या न्यायमूर्तीच्या विरोधातील आरोपांच्या चौकशीसाठीची सर्व कागदपत्रं सार्वजनिक करण्यात आली.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी दिल्ली हायकोर्टाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या सरकारी निवासस्थानी सापडलेल्या नोटांच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे. तीन न्यायमूर्तींची समिती स्थापन करण्यात आली असून या प्रकरणी न्या. यशवंत वर्मा (Yashwant Verma) यांची चौकशी होईल. नवी दिल्ली हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश डी.के. उपाध्याय यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या अहवालानंतर सुप्रीम कोर्टानं हा निर्णय घेतला आहे.
कामापासून दूर राहण्याचे आदेश
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी दिल्ली हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश डी.के. उपाध्याय यांना न्यायमुर्ती यशवंत वर्मा यांना न्यायदानाच्या कामापासून दूर राहण्याचे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टानं या संदर्भातील एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. सरन्यायाधीशांनी या प्रकरणी तीन सदस्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीत पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश शील नागू, हिमाचल हायकोर्टाचे मुख्य न्यायधीश जी. एस. संधावालिया आणि कर्नाटक हायकोर्टाचे न्यायाधीश अनू शिवरमन यांचा समावेश आहे.
राजीनाम्याची मागणी
हायकोर्टाच्या जजच्या घरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम सापडल्याने न्यायपालिकेत खळबळ उडाली आहे. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वात वर्मा यांची बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर काही न्यायमूर्तींनी त्यांच्या चीही मागणी केली आहे.