Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीस्वतःच्याच मुलीला मृत जाहीर करण्याची मागणी करत आहेत आईवडील

स्वतःच्याच मुलीला मृत जाहीर करण्याची मागणी करत आहेत आईवडील

वॉशिंग्टन : बेपत्ता भारतीय – अमेरिकन विद्यार्थिनी सुदीक्षा कोनांकी हिला मृत जाहीर करावे, अशी मागणी तिच्या आईवडिलांनी रडत रडत केली आहे. सुदीक्षाच्या पालकांनी डोमिनिकन रिपब्लिकच्या अधिकाऱ्यांकडे आपली मागणी नोंदवली आहे.

आयपीएलचा शुभारंभ कोलकाता – बंगळुरू सामन्याने होणार

विद्यार्थिनी सुदीक्षा कोनांकी हिच्या मृत्यूचा तपास एक तपास पथक करत आहे. या पथकाने दिलेल्या अहवालात सुदीक्षाचा बुडून मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हा अहवाल आल्यानंतर सुदीक्षाचे वडील सुब्बारायडू आणि आई श्रीदेवी कोनांकी यांनी पत्र लिहून डोमिनिकन रिपब्लिकच्या अधिकाऱ्यांनी सुदीक्षाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे पत्र द्यावे अशी मागणी केली आहे. अद्याप ही मागणी मान्य झालेली नाही. सुदीक्षा कोनांकी मृत्यू प्रकरणी डोमिनिकन रिपब्लिकच्या पोलिसांचा तपास सुरू आहे.

Devendra Fadnavis : ‘दंगलखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करणार’

डोमिनिकन रिपब्लिकमधील पुंता काना समुद्रकिनाऱ्यावरुन ६ मार्च २०२५ रोजी सुदीक्षा कोनांकी बेपत्ता झाली आहे. सुदीक्षा कोनांकी हिला शेवटचं समुद्रात पोहताना बघितले गेले होते. तिथून ती परतली नाही. नंतर कोणाचाही सुदीक्षाशी संपर्क झालेला नाही. यामुळे पाण्यात बुडून सुदीक्षाचा मृत्यू झाल्याची शक्यता तपास पथकाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन सुदीक्षा कोनांकीचा मृत्यू झाल्याचे जाहीर करावे आणि तिच्या मृत्यूचे प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी तिच्या आईवडिलांनी केली आहे.

डोमिनिकन रिपब्लिकच्या कायद्यानुसार कोणी गुन्ह्याची कबुली दिली अथवा गुन्हा घडल्याचे पुरावे तपास पथकाच्या हाती आले अथवा मृतदेह सापडला तरच मृत्यू जाहीर केला जातो. पण यापैकी काहीच घडले नसल्यामुळे डोमिनिकन रिपब्लिक सुदीक्षा कोनांकीच्या मृत्यूची घोषणा केलेली नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -