पुणे : पुण्यात (Pune) गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. अशातच पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जन्मदात्याने पत्नीवरच्या संशयामुळे पोटच्या ३ वर्षीय मुलाची हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना चंदननगर परिसरात घडली असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
IPL 2025 : आयपीएल २०२५च्या उद्घाटन सोहळ्यात रंगणार बॉलिवूडची मेहफील
पुण्यातील (Pune) चंदनगर परिसरात नराधम माधव साधुराव टीकेटी त्याच्या कुटुंबा सोबत राहत होता. आरोपी माधव आणि पत्नी उच्चशिक्षित आहेत. त्यांना आठ वर्षांची मुलगी आणि साडेतीन वर्षाचा मुलगा होता. माधव हा कंपनीत कामाला होता; पण काही महिन्यांपूर्वी त्याला कामावरून काढून टाकले होते; तसेच तो सतत दारूच्या नशेत असतो. माधव पत्नीवर नेहमी चारित्र्याचा संशय घेत होता. गुरुवारी सकाळी त्याचे पत्नीशी भांडण झाले. भांडणाच्या आवाजावरून त्यांचा तीन वर्षीय मुलगा (हिंमत माधव टीकेटी) झोपेतून उठला. दुपारच्या सुमारास आरोपी घरातून बाहेर पडत असताना हिंमत त्याच्या मागे लागला. त्यामुळे आरोपीने मुलाला दुचाकीवर बसवून सोबत नेले. खराडी परिसरात फिरल्यावर त्याने दारू प्यायली आणि एका दुकानातून धारदार चाकू खरेदी केला. त्यानंतर खराडी दर्ग्यासमोरील फॉरेस्ट पार्क परिसरात निर्जनस्थळी जाऊन चाकूने मुलाचा गळा चिरून खून केला.
मुलाला तिथेच टाकून तो सायंकाळी वडगाव शेरीतील एका लॉजमध्ये जाऊन झोपला. रात्रीचे नऊ वाजूनही पती आणि मुलगा घरी न आल्याने आईने चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी परिसरातील ‘सीसीटीव्ही’ आणि तांत्रिक विश्लेषणावरून आरोपीचा शोध घेतला. भरपूर दारू प्यायल्याने त्याला मुलाचा ठावठिकाणा सांगता येत नव्हता. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर आरोपीने कबुली दिली आहे. दरम्यान या नराधम बापाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.