Saturday, April 19, 2025
Homeक्राईमNarayan Rane : दिशा सालियन प्रकरणात नारायण राणेंचा मोठा खुलासा; ''उद्धव ठाकरेंचे...

Narayan Rane : दिशा सालियन प्रकरणात नारायण राणेंचा मोठा खुलासा; ”उद्धव ठाकरेंचे दोन फोन आले…

नेमकं काय म्हणाले नारायण राणे?…..

मुंबई : सध्या दिशा सालियन मृत्यू प्रकरण मोठ्या चर्चेत असून यामध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) दोषी असून सर्व राजकीय नेत्यांकडून यांच्यावर आरोप केले जात आहेत. खासदार नारायण राणे यांनी दिशा सालियन (Disha Salian Case) प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊ नये अशी विनंती करणारे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे आपल्याला दोन फोन आले होते असा दावा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला आहे.

आयपीएलचा शुभारंभ कोलकाता – बंगळुरू सामन्याने होणार

ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा मी मुंबईवरून घरी चाललो होतो, तेवढ्यात वांद्रे क्रॉस केल्यावर फोन आला. मिलिंद नार्वेकरचा फोन होता. म्हणाले, दादा साहेबांना तुमच्याशी बोलायचं आहे. मी म्हटलं, कोण साहेब. म्हणाले, उद्धवजी, त्यांच्याबरोबर मी आहे. ते गाडी चालवत आहेत. त्यांना बोलायचं आहे. मी म्हटलं, द्या.त्यांनी फोन घेतल्यावर मी म्हटलं जय महाराष्ट्र साहेब, बोला, ते म्हणाले, तुम्ही अजून जय महाराष्ट्र बोलता. मी म्हटलं, मरेपर्यंत बोलणार. हे माझं उत्तर लगेच. तुम्हाला माहीत आहे मी थांबत नाही.

उद्धव ठाकरे म्हणाले, नाही साहेब मला हे बोलायचंय तुम्हाला मुलं आहेत. मलाही मुलं आहेत. सध्या तुम्ही जे काही प्रेसला बोलता. आदित्यचं नाव घेता. माझी विनंती आहे की तुम्ही त्याचा उल्लेख करू नये. असं वाटतं म्हणून विनंती करायला फोन केला. मी म्हटलं, उद्धवजी एक गोष्ट लक्षात ठेवा. एक तर मी अमूक ठिकाणी, अमूक याच्यात कोण आहे याचा उल्लेख केला नाही. निरपराध एका मुलीची अत्याचार करून हत्या झाली हे म्हणतोय. आरोपींना अटक झाली पाहिजे हे म्हणतोय. त्यात तडजोड नाही. फक्त तुम्ही तुमच्या मुलाचं नाव घेतलं, त्याला संध्याकाळी जिथे जातो, तिथं जाण्यापासून सांभाळा. सांगा त्याला हे बरं नाही. माझ्या घराच्या समोर तो डिनो मोरिया राहतो.

तिथे हे लोक जमतात आणि काय साडे तीन चार तास धुमाकूळ घालतात. मला माहीत नाही. मला माहीत आहे, पण तुम्हाला सांगणार नाही. म्हणून मी सांगितलं तुम्ही त्यांना सांभाळा. उद्धव ठाकरे म्हणाले, साहेब मी पाहतो, सांगतो. पण तुम्ही तेवढं सहकार्य करा. मी म्हणालो, ठिक आहे. अन् त्यांनी फोन ठेवला, असं राणे यांनी म्हटलं आहे. (Narayan Rane On Uddhav Thackeray)

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, दुसरा फोन हा कोविड असताना आला. त्यावेळी माझ्या हॉस्पिटलचं उद्घाटन होतं. माझी राज्य सरकारकडे एक परवानगी बाकी होती. तेव्हा त्यांचा फोन आला. तुम्ही फोन केला होता. मी म्हटलो हो. कॉलेजच्या परवानगीसाठी केला होता. उद्धव म्हणाले, साहेब ते तर मिळेलच. पण तुम्हाला सांगतो जरा तुम्ही, प्रेस घेताना तो उल्लेख टाळाल तर बरं होईल. मी म्हटलं परत एकदा सांगतो, तुम्ही म्हणता तसा मी उल्लेख केला नाही. पण एक मंत्री होता असं मी म्हणतोय. हे दोन फोन त्यांनी केले, असं राणे (Narayan Rane) यांनी म्हटलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -