
/>
नियम १ : लाळेवरील बंदी मागे घेतली
आयपीएल २०२५ मध्ये खेळाडू चेंडूला लाळ लावून लकाकी आणण्याचा प्रयत्न करू शकतात. याआधी कोविड काळात म्हणजेच २०२० पासून आयपीएलमध्ये चेंडूला लाळ लावण्यावर बंदी लागू करण्यात आली होती. ही बंदी मागे घेण्यात आली आहे. यामुळे स्पर्धेत खेळाडू लकाकीसाठी चेंडूला लाळ लावू शकतात.
/>
नियम २ : दुसरा नवा चेंडू
आयपीएल २०२५ मध्ये दुसऱ्या डावात ११ षटकांनंतर दुसरा नवीन चेंडू आणला येईल. दवाचा प्रभाव कमी करण्यासाठी हा प्रयोग केला जाईल. संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होणार असलेल्या सर्व सामन्यांच्या दुसऱ्या डावात ११ षटकांनंतर दुसरा नवीन चेंडू आणता येईल. पण हा निर्णय पंचांनी परवानगी दिली तरच अमलात येईल. यामुळे संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होणार असलेल्या सर्व सामन्यांत एकूण तीन चेंडू वापरता येतील. पहिल्या डावात एक आणि दुसऱ्या डावात जास्तीत जास्त दोन अशा प्रकारे तीन चेंडू वापरता येतील. पण दुपारी साडेतीन वाजता सुरू होणार असलेल्या सामन्यांना फक्त दोन चेंडू वापरले जातील. प्रत्येक डावासाठी एकच नवा चेंडू वापरला जाईल. यामुळे दुपारी साडेतीन वाजता सुरू होणार असलेल्या सामन्यांमध्ये फक्त दोन चेंडूंचाच वापर होणार आहे.
नियम ३ : स्लो ओव्हर रेटसाठी सामना बंदी नाही
आयपीएल २०२५ मध्ये संघाच्या स्लो ओव्हर रेटसाठी कर्णधारांवर बंदी घातली जाणार नाही. त्याऐवजी कर्णधारांवर डिमेरिट पॉइंट्स आणि दंड अशा स्वरुपात कारवाई केली जाईल.
स्तर १ - २५ ते ७५ टक्के सामना शुल्क दंड अधिक डिमेरिट पॉइंट्स (तीन वर्षांसाठी वैध)
स्तर २ - चार डिमेरिट पॉइंट्स
नियम ४ : वाईडसाठी डीआरएसचा विस्तार
आयपीएल २०२५ मध्ये उंचीच्या रुंदीचे पुनरावलोकन करुन वाईडचे निर्णय देण्यासाठी डीआरएसचा वापर करता येईल. तसेच ऑफ-स्टंपच्या बाहेरचे वाईडचे निर्णय देण्यासाठी डीआरएसचा वापर करता येईल.