कोलकाता : इंडियन प्रीमिअरल लीग अर्थात आयपीएल २०२५ स्पर्धेची सुरुवात शनिवार २२ मार्च २०२५ पासून म्हणजेच आजपासून होत आहे. यंदाच्या आयपीएलचा शुभारंभ कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या सामन्याने होणार आहे. सामन्याची सुरुवात भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे. हा सामना कोलकाता येथे ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहे. आयपीएलच्या सर्व सामन्यांचे टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वाहिन्यांवर थेट प्रक्षेपण होणार आहे. तसेच जिओ हॉटस्टार या अॅपवर लाईव्ह स्ट्रिमिंग होणार आहे.
Devendra Fadnavis : 'दंगलखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करणार'
नागपूर : महाल आणि हंसापुरी भागात १७ मार्च रोजी झालेल्या दंगली प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ...
कोलकाता नाईट रायडर्स संघ : क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक) , अजिंक्य रहाणे (कर्णधार) , सुनील नरेन , आंग्रिश रघुवंशी , व्यंकटेश अय्यर , रिंकू सिंग , आंद्रे रसेल , रमणदीप सिंग , हर्षित राणा , वरुण चक्रवर्ती , स्पेन्सर जॉन्सन , वैभव अरोरा , रहमनुल्ला गुरबाज , मनिष पांड्ये, मोईन अली, एनरिक नॉर्टजे, रोवमन पॉवेल , अनुकुल रॉय , मयंक मार्कंडे , चेतन साकारिया , लुवनीथ सिसोदिया
स्वतःच्याच मुलीला मृत जाहीर करण्याची मागणी करत आहेत आईवडील
वॉशिंग्टन : बेपत्ता भारतीय - अमेरिकन विद्यार्थिनी सुदीक्षा कोनांकी हिला मृत जाहीर करावे, अशी मागणी तिच्या आईवडिलांनी रडत रडत केली आहे. सुदीक्षाच्या ...
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ : रजत पाटीदार (कर्णधार) , जितेश शर्मा (यष्टीरक्षक) , विराट कोहली , फिलिप सॉल्ट , देवदत्त पडिक्कल , लियाम लिव्हिंगस्टोन , टीम डेव्हिड , कृणाल पांड्या , भुवनेश्वर कुमार , जोश हेझलवूड , यश दयाल , स्वप्नील सिंग , लुंगी नगिडी , रोमारिओ शेफर्ड, मनोज भांडगे, रसिक दार सलाम, नुवान तुषारा , जेकब बेथेल , सुयश शर्मा , मोहित राठी , स्वस्तिक चिकारा , अभिनंदन सिंग