Saturday, April 19, 2025
Homeक्रीडाIPL 2025 : गुजरातने रोहित शर्माला कोचिंग स्टाफमध्ये केले सामील

IPL 2025 : गुजरातने रोहित शर्माला कोचिंग स्टाफमध्ये केले सामील

नवी दिल्ली : आयपीएल २०२५ (IPL 2025) चा पहिला सामना २२ मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु यांच्यात कोलकाता येथे होणार आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी, सर्व संघ त्यांच्या तयारीत व्यस्त आहेत आणि कोणतीही कसर सोडू इच्छित नाहीत. यासाठी गुजरात टायटन्सने वेगळीच युक्ती आखली आहे. या युक्तीचा भाग म्हणून संघाने रोहित शर्माला त्यांच्या ताफ्यात सामील केले आहे. यासाठी त्यांनी अनेक नवीन खेळाडू खरेदी केले आहेत. तसेच त्यांच्या प्रशिक्षकांनाही बळकटी दिली आहे. गुजरातने १८ व्या हंगामासाठी रोहित शर्माला त्यांच्या कोचिंग स्टाफमध्ये समाविष्ट केले आहे. जो एका खास भूमिकेत दिसणार आहे. हा एक मोठा फेरबदल मानला जात आहे.

IPL 2025 : आयपीएल २०२५च्या उद्घाटन सोहळ्यात रंगणार बॉलिवूडची मेहफील

रोहित शर्माचे नाव ऐकून तुमच्यापैकी बरेच जण गोंधळून जात असतील. पण आपण येथे हिटमॅनबद्दल बोलत नाही आहोत. खरंतर, हा रोहित भारताच्या दिव्यांग संघाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहे. जो यावेळी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्ससाठी साईड आर्म थ्रोअरची भूमिका बजावेल. यामुळे फलंदाजांना वेगवान चेंडूं विरुद्ध सराव करण्यास मदत होते आणि त्यांचा प्रतिक्रिया वेळ देखील सुधारतो. याच कारणास्तव ही जबाबदारी गुजरातने रोहितकडे सोपवली आहे. आयपीएल २०२५ (indian premier league 2025) मध्ये, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सचा संघ २५ मार्च रोजी अहमदाबादमधील त्यांच्या होमग्राऊंड नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरुद्ध पहिला सामना खेळताना दिसेल. यावेळी जोस बटलर, मोहम्मद सिराज आणि कागिसो रबाडा अशी काही मोठी नावेही सामील झाली आहेत, जी संघाला अधिक बळकट बनवण्यास कामी येणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -