Friday, May 9, 2025

क्रीडाताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजIPL 2025

Indian Premier League 2025 : एअरटेल, व्होडाफोन, आयडियाचे नवे जीओहॉटस्टार प्लॅन्स लाँच

Indian Premier League 2025 : एअरटेल, व्होडाफोन, आयडियाचे नवे जीओहॉटस्टार प्लॅन्स लाँच

हैदराबाद : भारतीय एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया यांनी आगामी इंडियन प्रीमियर लीग २०२५ (indian premier league 2025) हंगामापूर्वी निवडक प्रीपेड रिचार्ज प्लॅन्सवर नवीन प्लॅन जाहीर केले आहेत. या दोन्ही टेलिकॉम कंपन्यांनी नवीन ॲड-ऑन पॅक सादर केले आहेत, जे तुमच्या सक्रिय प्लॅनवर रिचार्ज करून JioHotstar चे मोफत सब्स्क्रिप्शन देतात. जीओसिनेमा आणि डिसनी+ हॉटस्टारच्या एकत्रीकरणातून भारतात नुकतेच लाँच झालेल्या जीओहॉटस्टार स्ट्रीमिंग सेवेमुळे ग्राहक आता आयपीएल सामने, चित्रपट, शो, अॅनिमे आणि डॉक्युमेंट्रीज ४के मध्ये मोबाईल आणि टीव्हीवर पाहू शकणार आहेत.



आयपीएलचा थरार अनुभवण्यासाठी हे नवे प्लॅन्स उपलब्ध असणार आहे. जिओ हॉटस्टार सबस्क्रिप्शनमुळे आयपीएल २०२५चे सामने ४ के मध्ये पाहता येणार आहेत. दोन्ही कंपन्यांनी ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. क्रिकेट चाहत्यांसाठी मनोरंजनाची पर्वणी असणार आहे.



एअरटेलचे जीओहॉटस्टारसह क्रिकेट पॅक :


एअरटेलने JioHotstar च्या मोफत सब्स्क्रिप्शनसह दोन नवीन क्रिकेट पॅक आणले आहेत.
१) १०० रु प्रीपेड पॅक : यात ५ जीबी डेटा आणि ३० दिवसांचे जीओहॉटस्टार अॅक्सेस मिळेल. या प्लॅनची वैधता ३० दिवसांची आहे.
२) १९५ रु पॅक : यात १५ जीबी डेटा आणि ९० दिवसांचे जीओहॉटस्टार सब्स्क्रिप्शन मिळते, या प्लॅनची वैधता ९० दिवसांची आहे. दोन्ही पॅक हे डेटा व्हाउचर्स आहेत, म्हणजेच कॉलिंग सुविधा यात तुम्हाला मिळणार नाहीत आणि त्यासाठी सक्रिय बेस प्लॅन असणे आवश्यक आहे.



व्होडाफोन आयडियाचे जीओहॉटस्टार प्लॅन्स


व्हीआयने एक डेटा व्हाउचर आणि दोन स्टँडअलोन प्रीपेड पॅक आणले आहेत, ज्यात जीओहॉटस्टार सब्स्क्रिप्शन मिळते.
१) १०१ रु डेटा व्हाउचर : हे डेटा व्हाउचर आयपीएल २०२५ पाहण्याचे सर्वात स्वस्त पर्याय आहे. यात ५ जीबी डेटा आणि ३ महिन्यांचे जीओहॉटस्टार सब्स्क्रिप्शन मिळते. याची वैधता ३० दिवसांची आहे. यासाठीही सक्रिय बेस प्लॅन आवश्यक आहे.


२) २३९ रु पॅक : यात अमर्यादित कॉलिंग, २ जीबी डेटा, ३०० एसएमएस आणि २८ दिवसांचे जीओहॉटस्टार सब्स्क्रिप्शन मिळते.
३) ३९९ रु पॅक : यात अमर्यादित कॉलिंग, रोज २ जीबी डेटा, दररोज १०० एसएमएस आणि २८ दिवसांचे जीओहॉटस्टार सब्स्क्रिप्शन मिळते.
४) २३९ आणि ३९९ रु पॅक : २३९ -आणि ३९९ रुपायचे हे स्टँडअलोन पॅक आहेत, म्हणजेच यांना बेस प्लॅनची गरज नाही.

Comments
Add Comment