मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएल २०२५ साठी मुंबई इंडियन्सचा सर्वाेत्कृष्ट कर्णधार राहिलेला रोहित शर्मा संघात सामील झाला आहे. टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्र्रॉफीच्या विजयानंतर आता हिटमॅन आयपीएल २०२५ साठी सज्ज झाला आहे. मुंबई इंडियन्सचा सलामीचा सामना २३ मार्चला चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध होणार आहे. यापूर्वी संघ सराव करतानाचे व्हीडिओ पाहायला मिळाले. यामधील मुंबई इंडियन्सने रोहित शर्माचा व्हीडिओ शेअर केला आहे.
मुंबई इंडियन्सला सर्वाधिक पाच आयपीएल ट्रॉफी जिंकून देणारा कर्णधार म्हणजे रोहित शर्मा आहे. गेल्या वर्षी, आयपीएल हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटवल्यानंतर, रोहित शर्मा मोठा चर्चेचा विषय होता पण आयपीएल २०२४ आणि आयपीएल २०२५ दरम्यान रोहितच्या आयुष्यात अनेक मोठे बदल झाले आहेत. दोन आयपीएल हंगामांमध्ये तो दोन आयसीसी ट्रॉफी जिंकणारा भारतीय कर्णधार बनला आहे.
पण यादरम्यान रोहित शर्माच्या वैयक्तिक आयुष्यातही मोठा बदल घडला आहे. हा मोठा बदल म्हणजे रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाबा झाला. रोहित शर्माच्या ग्लोव्हजवरदेखील याचाच प्रत्यय दिसून येत आहे. मुंबई इंडियन्सने सराव करतानाचा रोहित शर्माचा एक व्हीडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याच्या ग्लोव्हजवरील ‘SAR’ ही अक्षर दिसत आहेत. पण यादरम्यान रोहित शर्माच्या वैयक्तिक आयुष्यातही मोठा बदल घडला आहे. हा मोठा बदल म्हणजे रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाबा झाला. रोहित शर्माच्या ग्लोव्हजवरदेखील याचाच प्रत्यय दिसून येत आहे. मुंबई इंडियन्सने सराव करतानाचा रोहित शर्माचा एक व्हीडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याच्या ग्लोव्हजवरील SAR ही अक्षर दिसत आहेत.
मुंबई इंडियन्सने हा व्हीडिओ शेअर करत चाहत्यांनाच या अक्षरांचा अर्थ काय आहे, असे विचारले. यावर चाहत्यांनी लगेच ओळखत उत्तरे दिली आहे. रोहित शर्माच्या ग्लोव्हजवरील या SAR मधील S चा अर्थ समायरा (रोहितची लेक) A – अहान (रोहितचा लेक) R – रितिका (रोहितची पत्नी) असा आहे.