Saturday, April 19, 2025
Homeक्राईमDevendra Fadnavis : 'दंगलखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करणार'

Devendra Fadnavis : ‘दंगलखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करणार’

नागपूर : महाल आणि हंसापुरी भागात १७ मार्च रोजी झालेल्या दंगली प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलीस आयुक्त, पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. यानंतर दंगलखोरांकडून नुकसानीची भरपाई म्हणून पैसे वसूल केले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. जर आरोपी पैसे देऊ शकले नाहीत तर त्यांची मालमत्ता विकून नुकसान भरुन काढले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हिंसाचारात ज्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले त्यांना भरपाई दिली जाईल, मात्र ही रक्कम दंगलखोरांकडून वसूल केली जाईल. त्यांनी पैसे न भरल्यास त्यांची मालमत्ता जप्त करुन लिलाव केला जाईल; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आयपीएलचा शुभारंभ कोलकाता – बंगळुरू सामन्याने होणार

नागपुरात जे काही घडले ते पूर्णपणे पूर्वनियोजित होते. ही अचानक घडलेली घटना नव्हती. सरकार यावर कठोर कारवाई करणार आहे. दंगलीत ज्यांची वाहने, दुकाने, घरे आणि इतर मालमत्तेचे नुकसान झाले त्यांना राज्य सरकार भरपाई देणार आहे. हे पैसे सरकार दंगलखोरांकडून वसूल करेल; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

स्वतःच्याच मुलीला मृत जाहीर करण्याची मागणी करत आहेत आईवडील

नागपूर दंगल प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ९२ जणांना अटक केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यातील १२ आरोपी अल्पवयीन असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज,मोबाईल व्हिडिओ आणि पत्रकारांनी दिलेल्या रेकॉर्डिंगच्या मदतीने १०४ संशयितांची ओळख पटवली आहे. व्हिडीओ फूटेज आणि डिजिटल पुरावे यांच्या आधारे दंगलखोरांची ओळख पटवण्याचे काम अद्याप सुरू आहे. दंगलीत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी असलेल्या सर्वांवर कारवाई होणार आहे. सोशल मीडियाद्वारे चिथावणी देणाऱ्यांवरही कारवाई होणार आहे; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नागपूरमध्ये दंगल भडकवण्यासाठी सोशल मीडियाचाही वापर झाला. आतापर्यंत दंगलीकरिता चिथावणी देणाऱ्या ६८ पोस्ट ओळखण्याचे काम पूर्ण झाले आहे. इतर अनेक पोस्टची पडताळणी सुरू आहे. ज्यांनी वातावरण बिघडवले, अफवा पसरवली आणि चिथावणी देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला त्यांनाही नागपूर दंगल प्रकरणात सहआरोपी केले जाईल. समाजात तेढ पसरवून शांतता भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. दंगल करणाऱ्यांकडून नुकसान भरपाई वसूल केली जाईल. तसेच त्यांना न्यायालयात हजर करुन त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. दंगल करणाऱ्यांनी भरपाईसाठी पैसे दिले नाही तर त्यांची मालमत्ता जप्त करुन दंडाची वसुली करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

राज्य शासनाचा भर महाराष्ट्रात कायदा – सुव्यवस्था राखण्यावर आहे. पण भविष्यात राज्यात कुठेही दंगल झाली तर भरपाईसाठी नागपूर पॅटर्न राबवणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -