
पुणे : विकसित तंत्रज्ञान मानवाच्या प्रगतीला यशाच्या शिखरावर पोहचवण्यास मदत करत आहे. मात्र याच विकसित तंत्रज्ञानाची दुसरी बाजू पाहिली तर काही टवाळखोर त्याचा गैरवापर देखील करतात. या पार्श्वभूमीवर पुण्यात ड्रोन उडवण्यासाठी परवानगी घेणे अनिवार्य असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात औरंगजेबाच्या कबरीच्या वादाचे पडसाद उमटले. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची ...
पुणे जिल्ह्यात महत्त्वाची धार्मिक स्थळे, धरणे, केंद्रीय संस्था असून दहशतवादी कारवायांमध्ये ड्रोन कॅमेराद्वारे टेहळणी होवून त्याचा अतिरेकी कारवायांमध्ये उपयोग केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दौंड, बारामती, शिरुर तालुक्याच्या परिसरामध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन उडत असल्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असून नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोणत्याही खासगी व्यक्ती, कार्यक्रम व्यवस्थापन (इव्हेंट मॅनेजमेंट) व छायाचित्रण करणाऱ्या व्यावसायिकांनी ड्रोन कॅमेराचा वापर करताना त्यासाठी पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी यांनी जारी केले आहेत.
वाळू माफिया देखील टेहळणीसाठी ड्रोनचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही.ड्रोनच्या मध्यमातून टेहाळणी करुन इतर प्रकारच्या चोऱ्याही होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे हे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यासंबधी पूर्व माहिती सात दिवस आधी संबंधित पोलीस ठाण्यास कळवून पोलीस अधिकाऱ्यांची रितसर परवानगी घेणे बंधनकारक राहील, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी यांनी जारी केले आहेत. दरम्यान नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करण्यात येईल.