पुणे : पुण्यातील हिंजवडी अपघाताबद्दल नवी अपडेट समोर आली आहे. पुण्यातील हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हलरला बुधवारी आग लागली. या घटनेमागे बस चालकाचा हात असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी बसचालक जनार्दन हंबर्डीकर या नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हिंजवडी येथील व्योम ग्राफिक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला बुधवारी आग लागली. या टेम्पो ट्रॅव्हलरमधून कंपनीचे १४ कर्मचारी प्रवास करत होते. यापैकी आगीत ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. उरलेल्या १० जणांनी आग लागल्याचे समजताच गाडीतून उडी मारून पळ काढला. हा अपघात असल्याचे प्रत्यक्षदर्शनी समोर आले होते. मात्र पोलीस तपासादरम्यान धक्कादायक बातमी समोर आली. कर्मचाऱ्यांबरोबरील वाद आणि पगारवाढ न झाल्याच्या रागातून बसचालकाने स्वत:च बस पेटवली.
London Heathrow Airport : लंडन सबस्टेशनमध्ये भीषण आग…लंडनचा हिथ्रो विमानतळ २४ तासांसाठी ठप्प
मिळालेल्या माहितीनुसार, चालक जनार्दन याने कट रचून बसमध्ये आदल्या दिवशी बेंझिन नावाचे केमिकल आणू ठेवले होते. तसेच टोनर पुसण्यासाठी लागणाऱ्या चिंध्याही त्याने गाडीत ठेवल्या होत्या. बस हिंजवडी जवळ आल्यावर त्याने काडीपेटीची काडी पेटून चिंध्या पेटवल्या आणि केमिकल मुळे बस मध्ये आगीचा भडका उडाला. या आगीत कामगार सुभाष भोसले, शंकर शिंदे, गुरुदास लोकरे, राजू चव्हाण या चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. गाडीत बसलेल्या तीन लोकांवर आरोपी चालकाचा राग होता. त्यांना इजा पोहचविण्यासाठी त्याने हा प्रकार केला. त्याला कंपनीच्या जवळ किंवा आवारातच गाडी पेटवायची होती. मात्र, पळता येईल अशी जागा पाहून त्याने आग लावली. ज्या तिघांवर त्याचा राग होता, ते सुखरूप वाचले आहेत. घटनास्थळाजवळील एका कंपनीच्या सीसीटीव्हीमध्ये चालक गाडीच्या सीट खाली काहीतरी पेटवत असल्याचे पुसटसे दिसले होते. त्यावरून पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. दरम्यान पोलिसांनी बसचालक जनार्दन हंबर्डीकर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.