
मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद(ICC)चे अध्यक्ष जय शाह यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्ष क्रिस्टी कॉवेंट्री(Kirsty Coventry) यांना शुभेच्छा दिल्या आहेत. क्रिस्टी कॉवेंट्री(Kirsty Coventry) या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्ष बनणाऱ्या पहिल्या महिला आहेत. याशिवाय क्रिस्टी कॉवेंट्री(Kirsty Coventry) या झिम्बाब्वेच्या क्रीडा मंत्रीही आहेत. दरम्यान, आता त्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्षपद सांभाळतील.
आयसीसी अध्यक्ष जय शाह काय म्हणाले?
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर जय शाह यांनी त्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, लॉज एंजेलिस ऑलिम्पिक २०२८मध्ये क्रिकेटला सामील करण्यासाठी त्या प्रतिबद्ध आहे. यासाठी ते आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्ष क्रिस्टी कॉवेंट्री(Kirsty Coventry) यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.
Congratulations and best wishes to newly-elected IOC President @KirstyCoventry, an honour thoroughly deserved and something I’m humbled to have been present for in Greece after hosting you at the @ICC #ChampionsTrophy.
I look forward to working with you and your team on… pic.twitter.com/9ShJLxwL5w
— Jay Shah (@JayShah) March 20, 2025
याआधी कॉमनवेल्थ गेम्स २०२२ आणि आशियाई गेम्स २०२३मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. तर आता लॉस एंजेलिस ऑलिम्पिक गेम्स २०२८मध्ये क्रिकेटचा समावेश करण्याबाबत तयारी सुरू आहे. जर असे झाले तर तब्बल १२८ वर्षानंतर ऑलिम्पिक गेम्समध्ये क्रिकेटचे पुनरागमन होईल.
क्रिस्टी कॉवेंट्री(Kirsty Coventry)या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या दहाव्या अध्यक्ष आहेत. याशिवाय त्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन असतील ज्यांची निवड अध्यक्षपदी झाली आहे. क्रिस्टी कॉवेंट्री(Kirsty Coventry) यांना ग्रीसच्या कोस्टा नवारिनोमध्ये आयओसीच्या १४४व्या सेशनमध्ये अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले.