Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

'चिमण्यांसाठी घराबाहेर पाण्याचा घडा ठेवा'

'चिमण्यांसाठी घराबाहेर पाण्याचा घडा ठेवा'

मुंबई (खास प्रतिनिधी) : मानव जेव्हापासून वस्ती करून राहू लागला तेव्हापासून त्यांच्या आजूबाजूला चिमणीचा अधिवास आहे. त्यामुळे चिमण्यांच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा 'इंडियन स्पॅरोमॅन' म्हणून ओळखले जाणारे व नेचर फॉरएव्हर सोसायटीचे अध्यक्ष मोहम्मद दिलावर यांनी व्यक्त केली.

चिमण्यांच्या संवर्धनासाठी घराबाहेर पाण्याचा पड़ा ठेवा, नेस्ट बॉक्स आणि फीड बॉक्स बसवा, पार्किंग लॉट आणि सोसायटीमध्ये नेस्ट बॉक्स ठेवा, असे आवाहनही या कार्यशाळेच्या माध्यमातून त्यांनी केले. जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने मुंबई पालिका व नेचर फॉर एव्हर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन इमारत सभागृहात गुरुवारी एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

या कार्यशाळेत मोहम्मद दिलावर बोलत होते. मुंबई पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उपायुक्त (उद्याने) चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हो कार्यशाळा पार पडली.

Comments
Add Comment